मुंबई : आज चर्चा आहे बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टार संजय मिश्रा यांची, एकेकाळी ज्यांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर काम करायला सुरुवात केली होती. होय, संजय यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित हा महत्त्वाचा खुलासा केला आहे. संजय यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे की, मृत्यूला अगदी जवळून पाहिल्यानंतर ते इतके तुटले की, सर्व काही सोडून गंगोत्री येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर ऑम्लेट आणि मॅगी विकू लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे की, काही वर्षांपूर्वी मी खूप आजारी पडू लागलो होतो. ते पुढे म्हणाले, 'ते पूर्णपणे मृत्यूशी झुंझ देत होते, काही दिवस वडिलांसोबत राहिलो, अचानक ते मला सोडून गेले आणि त्यांच्या जाण्याने मी पूर्णपणे मोडून पडलो'. वडिलांचा अंत्यसंस्कार केल्यानंतर आईशी बोलून मी कुठेतरी गेलो होतो. मला मुंबईला अजिबात परतायचं नव्हतं, असे संजय सांगतात.


मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यानंतर मला वाटू लागलं की, 'हेच जीवन आहे, तर वरील गोष्टींकडे का बघू नये, त्यांनी ज्या जगाकडे पाठवले, ते मला डोंगरात कुठेतरी चांगलं दिसतं'. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यानंतर संजय गंगोत्रीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वृद्धाच्या ढाब्यावर काम करू लागले. असं म्हणतात की, काही दिवसांनीच लोकं त्यांना इथे ओळखू लागले. नंतर संजय मिश्रा यांना रोहित शेट्टीच्या ऑफिसमधून ऑल द बेस्ट या चित्रपटासाठी फोन आल. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं.