मुंबई : 'गंदी बात' सिरीज  मधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अन्वेशी जैन हिच्यासोबत गेल्या 24 तासात असं काही घडलं आहे की, यावर तिचाच विश्वास बसत नाहीये. अन्वेशीने ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली असून सर्वांचे आभार मानले आहेत. खरंतर, अन्वेशीच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची यादी खूप वेगाने वाढत आहे. ज्यावर तिचा स्वतः विश्वास बसत नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्वेशीकडून गुडन्यूज शेअर  
स्वत:चा एक सुंदर फोटो शेअर करत अन्वेशीने लिहिलंय की, "आम्ही 5.3 मिलीयन फॉलोअर्सला टप्पा गाठला आहे! काय होतय  हे फक्त देवालाच माहीत आहे... 24 तासांत माझे 71 हजार फॉलोअर्स वाढले ​​आहेत. जर ही जादू नाही तर, मग हे काय आहे हे मला माहीत नाही. तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात हे पाहून मला खूप आनंद होत आहे. तुम्हा सर्वांचे आभार." अभिनेत्रीचं वय फक्त 30 वर्ष आहे.



सोशल मीडियावर एक्टिव्ह अन्वेषी
अन्वेशी अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. जे व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अन्वेशीचे वेगाने वाढणारे फॉलोअर्स हे पुरावे आहेत की, अभिनेत्रीची लोकप्रियता खूप वेगाने वाढत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे  फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.