Somy Ali on Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली ही सुपरस्टार सलमान खानसोबत कधी रिलेशनशिपमध्ये होते. ती जवळपास 8 वर्ष सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती नेहमीच त्यांच्या नात्यावर बोलताना दिसते. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी आणि कटरीना कैफचा देखील उल्लेख केला आहे. आता तिनं ऐश्वर्या रायचा देखील उल्लेख केला आहे. यावेळी तिनं थेट असं म्हटलं की लॉरेन्स बिश्नोई सलमान खानपेक्षा चांगला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमी अलीनं ही मुलाखत आयएएनएसला दिली आहे. जेव्हा तिला विचारण्यात आलं की 'सलमान खानचं  त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी आणि कतरिना कैफसोबत चांगलं नातं आहे, पण तुझ्यासोबत नाही.' यावर उत्तर देत सोमी अली म्हणाली, 'सलमान माझ्यासोबत ज्या प्रकारे वागला आहे, तसं त्यानं कोणासोबत केलं नाही. संगीता आणि कतरिनाला सलमाननं इतकी वाईट वागणूक दिलेली नाही, जितकी मला दिली. तो ऐश्वर्यासोबत देखील खूप वाईट वागला. त्यानं ऐश्वर्याच्या खांद्याचं हाड देखील मोडलं होतं. पण त्यानं नक्की कतरिनाला कशी वागणूक दिली हे मला माहित नाही.'


सलमान आणि लॉरेन्स बिष्णोईची तुलना 


पुढे सलमान आणि लॉरेन्स बिष्णोईची तुलना करत सोमी अली म्हणाली, 'त्यानं माझ्यासोबत जे केलं, त्यावरून मी सांगू शकते की लॉरेन्स बिष्णोई त्याहून चांगला आहे. त्यानं हे देखील सांगितलं की कशा प्रकारे सलमाननं तिची मारहान केली होती आणि त्याच्या घरातील मोलकरिन दरवाजा ठोकत विनवणी करत होती की तिला मारू नका.'


सोमीची अवस्था पाहून तब्बू भारावली...


सोमीनं पुढे सांगितलं की 'एकदा तब्बूनं तिची अवस्था पाहिली आणि ती रडू लागरी. मला पाठीत होणारी वेदना खूप जास्त होती आणि मी अंधरुणावरून बराच वेळ उठली नव्हती. तब्बू माझी अवस्था पाहून रडू लागली होती, पण तरी सलमान मला भेटायला आला नाही.' त्यानं हे देखील सांगितलं की तिची आई आणि जवळच्या मित्रांना सलमान कसा वागायचा याविषयी संपूर्ण कल्पना नाही. 


हेही वाचा : 'स्त्री 2' दिग्दर्शक पडद्यावर घेऊन येणार Vampire Love Story; कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?


सोमीनं पुढे हे देखील सांगितलं की 'सलमानसोबत असलेल्या तिच्या नात्यावर ती एक पुस्तक लिहितेय. ज्यात ती सगळं काही सविस्तर माहिती देणार आहे. सोमी अली 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये काम करत होती.'