सलमानच्या सततच्या `वन नाईट स्टॅंड`ला कंटाळली होती सोमी अली; Aish चा उल्लेख करत केले गंभीर आरोप
Somy Ali on Salman Khan`s 8 Night Stand : सोमी अलीनं सलमान खानविषयी केला मोठा खुलासा, `वन नाईट स्टॅंड` विषयी खुलासा केला करत म्हणाली...
Somy Ali on Salman Khan's 8 Night Stand : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. अनेकदा ती सलमान खानच्या विरोधात बोलताना दिसते. सलमान विषयी तिनं अनेकदा काही विधान करत गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईत सुरु असलेल्या वादांवर कमेंट केली होती. सोमीनं सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. इतकंच नाही तर तिनं लॉरेन्स बिष्णोईला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. या सगळ्यात आता सोमी अलीनं सलमान खानसोबतच्या तिच्या रिलेशनशिपवर पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.
आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीनं सलमानसोबतच्या 8 वन नाईट स्टॅंडविषयी खुलासा केला आहे. सोमी अलीनं सांगितलं की 'मी अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण यूएसमध्ये माझ्या एनजीओवर काम करते. लोकं मला आजही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखतात. हा मला असलेला सगळ्यात जास्त मोठा श्राप आहे. अमेरिकेत मी खूप चांगलं काम केलं आहे आणि आयुष्यात खूप काही कमावलं आहे पण तरी सुद्धा लोकं मला सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखतात.'
सोमी तिच्या आणि सलमान खानच्या रिलेशनशिपच्या डिटेल्स देत म्हणाली, 'सलमानची एक पद्धत आहे. प्रत्येकीसोबत सात वर्ष. त्याचं सत्य समोर येण्या आधी मुली त्याच्यासोबत जवळपास सात वर्ष राहतात. लक्षवेधी गोष्ट ही आहे की तो कधीचं नातं तोडत नाही तर मुलगी त्याच्यासोबतचं नात तोडते. तिला सलमानचं खरं रुप समजायला सात वर्षांचा काळ लागतो.'
सलमानसोबत 8 वन नाईट स्टॅंड
सोमीनं सलमानच्या आठ वन नाईट स्टॅंडविषयी इंडस्ट्री सोडल्याचं सांगितलं. जेव्हा एका रेडिट युजरनं त्याच्याशी बॉलिवूड सोडण्याचं कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की 'कारण मी सलमानच्या एक नाही तर 8 वन नाईट स्टॅंडला कंटाळले होते. त्याशिवाय रोजच्या शारिरीक आणि शाब्दिक अत्याचारा व्हायचा. मी इंडस्ट्री तेव्हा सोडली जेव्हा माझा बॉयफ्रेंड ऐश नावाच्या एका नव्या मुलीला घेऊन आला होता. मी त्याच्या वन नाईट स्टॅंडला कंटाळले होते आणि मग मी माझं शिक्षण पूर्ण केलं.'
हेही वाचा : सावत्र मुलीच्या गंभीर आरोपांनंतर स्पॉट झाली रुपाली गांगुली; नवरा, मुलानं पापाराझी दिसताच जोडले हात
सोमी पुढे सलमान खानचं वय आणि त्याच्या वागणुकीवर कमेंट करत म्हणाली, 'पुढच्या महिन्यात सलमान हा 59-60 वर्षांचा होणार आहे. तरी देखील प्लेग्राऊंड किंवा शाळेत शोषण करणाऱ्यांसारखा वागतो. त्याच्या इनसिक्योरिटीमुळे तो लोकांचं शोषण करतो. आता देखील लोकांना सांगतो की त्यांनी माझ्याशी बोलायला नको.'