VIDEO : सावत्र मुलीच्या गंभीर आरोपांनंतर स्पॉट झाली रुपाली गांगुली; नवरा, मुलानं पापाराझी दिसताच जोडले हात

Rupali Ganguly : रुपाली गांगुलीच्या लेकीनं केलेत गंभीर आरोप... तर त्यानंतर पहिल्यांदाच स्पॉट झालेल्या रुपाली, तिचा नवरा आणि मुलानं पापाराझींना पाहताच जोडले हात

दिक्षा पाटील | Updated: Nov 5, 2024, 01:42 PM IST
VIDEO : सावत्र मुलीच्या गंभीर आरोपांनंतर स्पॉट झाली रुपाली गांगुली; नवरा, मुलानं पापाराझी दिसताच जोडले हात title=
(Photo Credit : Social Media)

Rupali Ganguly : 'अनुपमा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अभिनेत्री रूपाली गांगुली या मालिकेतील तिच्या 'अनुपमा' या भूमिकेसाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून रुपाली ही तिच्यावर सावत्र मुलीनं केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. तिचा नवरा अश्विनची पहिल्या लग्नातून असलेली लेक ईशा वर्मा तिच्यावर सतत विविध आरोप करताना दिसते. त्यामुळे ती वादात अडकली होती. या सगळ्यात रुपाली तिच्या नवऱ्या आणि मुलाला पापाराझींनी स्पॉट केलं. दरम्यान, या प्रकरणात रुपाली गांगुलीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

नेमका वाद कधी सुरु झाला?

हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा अश्विन वर्माची लेक ईशानं रुपाली गांगुलीवर आरोप केला की तिची मानसिक स्थिती ठीक नाही. कथितपणे 2020 मधल्या एका नोटमध्ये ईशानं रुपालीवर आरोप करत सांगितलं की ती मीडिया समोर दाखवते की तिचा माझ्या वडिलांसोबत सुखी संसार सुरु आहे, खरंतर ती त्यांना कंट्रोल करत आहे आणि मानसिकरित्या त्रस्त आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लेकीच्या आरोपांवर अश्विन यांनी उत्तर देत त्यांनी रुपालीची बाजू घेतली आणि आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत म्हटलं की 'माझ्या पहिल्या लग्नातून मला मुली झाल्या, ज्याविषयी मी आणि रुपाली नेहमीच मोकळेपणानं बोलतो. घटस्फोट झाल्याचं दु:ख आहे आणि मी समजू शकतो की माझी मुलगी अजूनही त्या सगळ्या भावनांमधून जात आहेत. माझ्या पहिल्या लग्नात काही गोष्टी घडल्या ज्याच्याशी रुपालीचं काही घेणं देणं नव्हतं.'

ईशानं एका मुलाखतीत सांगितलं की 'हा फक्त एक विषय नाही. हे माझं आयुष्य आहे आणि माझं बालपण आहे जे त्रास मी सहन केला आहे. तर रुपालीला अनुपमा या भूमिकेत पाहणं किती कठीण होतं. अशी एक भूमिका जे तत्वांसाठी ओळखली जाते. मनोरंजन क्षेत्रात तिची एक वेगळीच प्रतिमा आहे आणि ते पाहताना मला फार दु:ख होतं.'

हेही वाचा : "...घरात 'लक्ष्मी' आली"; तेजस्विनी पंडितनं चाहत्यांसोबत शेअर केली Good News

दरम्यान, या सगळ्या आरोपांवर रुपाली गांगुलीनं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रुपाली, तिचा नवरा आणि मुलाला जेव्हा पापाराझींनी स्पॉट केलं तेव्हा त्यांनी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी फक्त पापाराझींसमोर हात जोडले. त्यांचं एकमेकांवर किती प्रेम करतात ते दिसतंय.