Sonakshi Sinha Boyfriend Huma Qureshi Video: बॉलिवूड सेलिब्रेटींचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. हुमा कुरेशी चक्क अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या बॉयफ्रेंडला पाण्यात ढकलताना दिसते आहे आणि सोबतच त्याला भरपूर मारतानाही दिसते आहे. परंतु यामागील सत्य काहीतरी वेगळं आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला असून या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मागील वर्षी 'डेबल XL' या चित्रपटातून एकत्र काम केले होते. या चित्रपटाची तूफान चर्चा रंगलेली होती. सोबतच सोनाक्षी सिन्हा हिची ओटीटी डेब्यू असलेली पहिली वेबमालिका 'धहाड' प्रदर्शित झाली होती, जिची बरीच चर्चा होती. 


सोनाक्षी सिन्हा लग्न कधी करणार याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. सध्या तिच्या बॉयफ्रेंडचीही चर्चा रंगलेली असते. झहीर इक्बालला ती डेट करत असल्याचे कळते आहे. काही दिवसांपुर्वी ते दोघं एकत्र नवरात्रीच्या निमित्तानं गरब्याला जमले होते. त्यावेळी त्या दोघांचीही चर्चा होती. अनेकदा ते एकत्र स्पॉटही होताना दिसतात. सध्या झहीर इक्बालसोबत हुमा कुरेशीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र जोरात चर्चा आहे. हुमा आणि तो स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. त्यांची मस्ती इतकी होती की ते पाहून नेटकऱ्यांनी नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. हुमा कुरेशी त्याच्यासोबत नक्की काय करतेय असाही प्रश्न नेटकरी विचारत आहेत. 


हेही वाचा : 'तुझी वेब सीरिज टुकार होती' म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला अभिनेत्याचं तिथल्या तिथे सडेतोड उत्तर


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ खुद्द झहीरनंच आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओखाली नील नितीन मुकेश, पुलकीत सम्राट, पत्रलेखा यांनी कमेंट् केल्या आहेत. सर्वांनी यावेळी फनी कमेंट्स केल्या आहेत. दोघंही स्विमिंग पूलमध्ये फाईट करताना दिसत आहेत. कधी ती त्याला पाण्यात ओढताना दिसते आहे तर कधी त्याला पाण्यात जोरात धक्का देतानाही दिसते आहे. तर कधी तो तिला पाण्यात जोरात धक्का मारताना दिसतो आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. यावेळी काही नेटकऱ्यांनी अशी कमेंट केली आहे की कधीही महिलांची पंगा घेऊ नका नाहीतर असं होईल.