मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर सगळ्यात लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने एखादा फोटो व्हिडीओ शेअर करताच व्हायरल होवू लागतात. नुकताच एक व्हिडीओ सोनाक्षीचा समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत थिरकताना दिसत आहे. 'चिंता ता ता' गाण्यावर दोघंही डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्रीचा हा डान्स व्हिडिओ संगीतकार साजिद खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये  लिहिलं आहे की, हाहाहा, माझी रॉकस्टार्स सोनाक्षी आणि झहीरसोबत डान्स करताना खूप मजा आली. मस्त वेळ भावाची पार्टी..चिंता ता ता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच सलमानने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली. या पार्टित सोनाक्षी त्याच्या बॉयफ्रेडसोबत आली होती. सलमान खानने 27 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत भाईजानचे सर्व जवळचे मित्र दिसले. यावेळी सोनाक्षी गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसत आहे, तर इक्बाल कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.


दोन वर्षांपूर्वी झहीर त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती.  सोनाक्षीसोबतचा एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'आय लव्ह यू' लिहून झहीरने सोनाक्षीसोबतचे आपलं नातं अधिकृत केलं होतं. याच व्हिडीओवर कमेंट करत सोनाक्षीने लिहिलं की, धन्यवाद...लव्ह यू... 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे सोनाक्षीचा बॉयफ्रेंड
झहीर इक्बालचा जन्म 10 डिसेंबर 1988 रोजी मुंबईत झाला. त्याचे बाबा इक्बाल रत्नासी हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे मित्र आहेत. झहीर ज्वेलर्स कुटुंबातील आहे.  2019 मध्ये  सलमानने झहीरला  चित्रपटांमध्ये लॉन्च केलं. 'नोटबुक' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यामुळे तो त्याच्या करिअरमध्ये फारसा यशस्वी झाला नाही.


2014 मध्ये आलेल्या 'लेकर हम दीवाना दिल' फेम दीक्षा सेठसोबत झहीरचं नाव सोनाक्षीपूर्वी जोडलं गेलं होतं. यानंतर झहीरचं नाव सना सईदसोबत जोडलं गेलं. सना 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटात दिसली आहे. जरी झहीरने याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही.