गर्दीत घाणेरड्या हेतूने अभिनेत्रीला स्पर्श, अंगावर काटा उभा करणारा अनुभव
या घटनेनंतर बराच काळ अभिनेती होती धक्क्यात
मुंबई : अनेकदा कलाकार आपल्या सुरक्षेवर खूप पैसा खर्च करतात, हे आपण अनुभवलंय. या मागे कारण त्याचं फेम असलं तरीही उद्देश हा सुरक्षेचाच आहे. गर्दीत कलाकारांना घाणेरड्या स्पर्शांना सामोरं जावं लागतं. एक सामान्य चूकही या कलाकारांना आयुष्यभरासाठी भारी पडू शकते. असंच काहीस बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत झालं आहे. एक व्यक्ती सोनाक्षीला घाणेरड्या हेतूने स्पर्श करत होता. हा तिचा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.
चुकीच्या पद्धतीने स्पर्श
२०१० साली दबंग सिनेमाच्या इव्हेंट दरम्यान सोनाक्षी सिन्हाला पाहून गर्दी वाढली. गर्दीवर नियंत्रण सुटल्यामुळे अनेकजण अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला घाणेरड्यापद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागले. ही घटना दक्षिण g मुंबईतील मंत्रालयासमोर गांधी मैदानात घडली. या घटनेचा सोनक्षीवर खूप मोठा परिणाम झाला. ती या धक्क्यातून सावरलीच नव्हती. या घटनेचा सोनाक्षीच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला.
करिअरमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न
सोनाक्षी सिन्हा एका सेलिब्रिटी कुटुंबातून येते. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाची खूप चर्चा आहे. तसेच ते एक मंत्री देखील आहेत. अशावेळी सोनाक्षीवर कायमच प्रेशर राहिलं आहे. तरी देखील अभिनेत्रीच्या अभिनयाचं कायमच कौतुक झालं आहे. मात्र तिचं फिल्मी करिअर अद्याप तितकसं यशस्वी राहिलेलं नाही. जेवढं तिच्या वडिलांच राहिलं आहे.
या अभिनेत्यासोबत जोडलं गेलं नाव
सोनाक्षी सिन्हाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनेत्री हुमा कुरैशीसोबत Double XL मध्ये दिसली. या सिनेमात तिच्यासोबत जहीर इकबाल देखील होता. ज्याच्यासोबत सोनाक्षीचं अनेकदा नाव जोडलं गेलं. जहीर इक्बालने आपल्या करिअरला 'नोटबुक' या सिनेमातून बॉलिवूडमधून डेब्यू केला आहे