मुंबई : बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेभी सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनाक्षी चर्चेत आली आहे म्हणण्यापेक्षा ती अडचणीत सापडली आहे असं म्हणावं लागेल. एका रेडिओ शो दरम्यान केलेल्या जातीवाचक टिप्पणीमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावरही सुद्धा तिला ट्रोल करण्यात आले आहे. आपल्यावर उठणारी ही टीकेची झोड पाहता आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत अखेर तिने महत्त्वाचं पाऊल उचलत आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोडीओ शो दरम्यान सोनाक्षी तिच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलत होती. त्याचवेळी उत्साहाच्या भरात ती असंकाही म्हणाली ज्यामुळे जातीभेदाचं वक्तव्य केल्याचं म्हणत तिला निशाणा  करण्यात आलं. एअरपोर्ट लूकविषयी सांगत सोनाक्षी म्हणाली, 'मी घरी जाऊन भं...(जातिवाचक शब्दाचा प्रयोग) वेशात एअरपोर्टला जाईन. कारण, तुम्हालासुद्धा असं कधीच वाटणार नाही की तुमचा चेहरा नेहमी कॅमेऱ्यासाठी नेटका असायलाच हवा.'


'दबंग गर्ल'चं हे वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे वाल्मिकी समाजाने तिच्यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर सोनाक्षीने लोकांच्या भावना दुखावल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागीतली. 


'मी वाल्मिकी सामाजाचा प्रचंड आदर करते. त्याचप्रमाणे त्यांनी समाज आणि देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करते. माझ्याकडून चुकून वापरण्यात आलेल्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या गोष्टीसाठी माफी मागते', असं लिहित तिने जाहीर माफी मागितली.