मुंबई : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या बबली इमेजवरून चर्चेत असते. सोनाक्षी तिच्या फिटनेस आणि लूक बद्दलही भलतीच चर्चेत असते. सोनाक्षीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो, पण तिच्या खाजगी आयुष्याबद्दल फार कमी गोष्टी समोर येतात. सध्या तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून आपण अंदाज लावू शकतो की, तिच्या आयुष्यात कोण्या खास व्यक्तीची एन्ट्री झाली असावी. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती अभिनेता जहीर इक्बाल सोबत दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जहीरने हा फोटो गतवर्षी तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पोस्ट केला होता. जो आता व्हायरल होत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'सोनाक्षी जयंती'च्या शुभेच्छा असे लिहिले आहे. 'हॅप्पी बर्थडे सोना, माझ्या हातात असते तर तुझा दिवस मी राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला असता.' अशाप्रकारे जहीरने पोस्टला कॅप्शन दिले आहे.


एका मुलाखतीत सोनाक्षीला याबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा तिने आपण सिंगल असल्याचे सांगितले. ती म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यातील राजकुमाराची आतुरतेने वाट पाहत आहे. असे झाले तर मी सर्वात आधी तुम्हाला नक्की सांगेल.' 


सोनाक्षीचा बहुप्रतिक्षित 'कलंक' चित्रपट येत्या १७ तारखेला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटात सोनाक्षी अभिनेता आदित्य राय कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय तिने 'दबंग ३' चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केली आहे.