गणेश चर्तुथीला Sonalee Kulkarni झाली भावूक; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मात्र ती खूप भावूक झाली आहे.
Sonalee Kulkarni: सार्वजनिक मंडळापासून ते घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. राजकारण असो वा बॉलिवूडमधील कलाकार हे देखील गणरायाच्या सेवेत रुजू झाले आहे. सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मात्र ती खूप भावूक झाली आहे. तिच्याकडे दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. पण यंदा ती बाप्पांना मीस करत आहेत.
कारणही तसंच आहे, सोनालीची लाडकी आजी बाप्पाकडे गेल्यामुळे त्यांच्याकडे यंदा गणरायाचं आगमन झालं नाही आहे. सोनाली आणि तिच्या आजीचं नातं खूप खास होतं. आजीच्या जाण्यामुळे सोनालीसोबत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सोनालीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या भावना मांडल्या असून गणपती आणि आजीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. काही फोटोमध्ये सोनाली बाप्पाची मूर्ती साकारताना दिसत आहे.