`तो बेडरुम सीन शूट करताना...`, मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने सांगितला बॉलिवूडमधील तो अनुभव
सोनाली कुलकर्णीने एका मुलाखतीत संजय दत्तसोबतच्या बेडरुमच्या सीनमागची गोष्ट सांगितली आहे. यावेळी संजय दत्त तिला काय म्हणाला याबद्दल तिने खुलासा केला आहे.
Sonali Kulkarni : चित्रपट असो किंवा मालिका यामध्ये काही वेळा इंटीमेट सीन शूट करताना अनेक गोष्टी घडत असतात. असाच प्रकार मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत एका चित्रपटा दरम्यान घडला आहे. ज्यामध्ये संजय दत्तसोबत बेडरुम सीन शूट करताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची तब्येत बिघडली होती.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'मिशन काश्मीर' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत काम केले होते. 'मिशन काश्मीर' चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि संजय दत्त यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक बेडरुम सीन होता. हा सीन शूट करण्यासाठी जेव्हा सोनाली कुलकर्णी आली तेव्हा ती थरथर कापत होती. यावर अभिनेत्रीने 24 वर्षांनंतर खुलासा केला आहे.
बेडरुम सीनच्या वेळी नेमकं काय घडलं?
सोनाली कुलकर्णी हिने सिद्धार्थ कन्नन यांच्यासोबत संवाद साधत असताना मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये तिने 'मिशन काश्मीर' चित्रपटातील एका सीन संदर्भात खुलासा केला आहे. सोनाली म्हणाली की, 'मिशन काश्मीर' या चित्रपटात बेडरुम सीन शूट करायचा होता. नेहमीप्रमाणे मी माझा पोशाख बदलला. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या केशभूषाकाराने मला अचानक विचारले की, 'तू वॅक्सिंग केले आहेस ना?' त्यावेळी मला एकदम धक्काच बसला. त्यावेळी मी गाऊन घातला होता आणि माझे ओठ थरथरत होते.
संजय दत्त काय म्हणाला?
पुढे सोनाली कुलकर्णी म्हणाली की, या बेडरुम सीनमध्ये काहीच नव्हते. फक्त अभिनेत्याला मिठी मारायची होती. पण शूटिंगच्या वेळी मी खूप घाबरली होती. मला बघून संजय दत्तने मला आवाज दिला. तो म्हणाला की, या बेडरुम सीनमध्ये काहीच नाही फक्त दोन डायलॉग आणि एक मिठी मारायची आहे. मी देखील घाबरलो आहे. आता तुम्ही देखील असं घाबरत असाल तर हा सीन कसा होणार. त्यामुळे तुम्ही जरा आराम करा. असं संजय दत्त सोनाली कुलकर्णीला म्हणाला होता.
मिशन काश्मीर बॉक्स ऑफिसवर हिट ठरला
'मिशन काश्मीर' चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले होते. या चित्रपटात अनेक कलाकार होते. ज्यामध्ये ह्रतिक रोशन, जॅकी श्रॉफ आणि प्रिती झिंटा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. 2000 मधील सर्वात जास्त कमाई करणारा हा तिसरा चित्रपट होता.