मुंबई : जीवनात कधी कोणती घटना घडेल सांगता येत नाही. 12 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अभिनेत्रीच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं मंगळवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.  निधन झालं तेव्हा त्या गोव्यात होत्या. सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्यात गेल्या होत्या. 43 वर्षीय सोनाली फोगटच्या निधनाने मनोरंजन आणि राजकारण जगताला धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली  फोगट बॉलिवूड , राजकारण आणि सोशल मीडियावर सक्रिय होत्या. फोगट फक्त त्यांच्या प्रोफेशन जीवनामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत राहिल्या. जेव्हा 43 वर्षीय सोनाली फोगट यांचं नाव 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत जोडलं गेलं तेव्हा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 


ही गोष्ट आहे बिग बॉसच्या घरातील आहे. जेव्हा सोनाली यांनी अभिनेता अली गोनीबद्दल असलेल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या. एका मुलाखतीत सोनाली यांनी याबाबत मोठा खुलासा देखील केल्या. 


अली गोनीबद्दल असलेल्या भावनाबाबत सांगताना त्या म्हणाल्या, 'मला जे वाटलं ते मी सांगितलं. ही अगदी साधी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही अशा वातावरणात असता ज्या ठिकाणी तुमचं जवळचं असं कोणी सोबत नसतं. तेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल अशा भावना येतात.'


'जर कोणी आपल्या मनातील भावना सर्वांसमोर मांडत असेल तर, त्या गोष्टी थट्टा न करता प्रशंसा करायला हवी. जेव्हा मी अली गेनीबद्दल भावना व्यक्त केल्या, तेव्हा मला ट्रोल करण्यात आलं....' असं देखील सोनाली मुलाखतीत म्हणाल्या. 


पतीच्या निधनानंतर राजकारणात सोनाली यांचा प्रवेश 
सोनाली फोगट यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ उतार होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचं लग्न राजकारणी संजय फोगट यांच्याशी झालं होतं, पण 2016 मध्ये त्यांचे निधन झालं. यानंतर अभिनेत्रीने राजकारणात पाऊल ठेवलं आणि नाव कमावलं. सोनाली फोगट यांना एक मुलगीही आहे. त्यांच्या मुलीचं नाव यशोधरा असं आहे. 


 2016 मध्ये, सोनाली फोगट प्रसिद्धीच्या झोतात आल्या जेव्हा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सोनाली त्यावेळी मुंबईत होत्या. सोनालीचे पती राजकारणात सक्रिय होते. पतीच्या निधनानंतर सोनाली यांना मोठा धक्का बसला होता.