मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आहुजा सध्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अधूनमधून सोनम बेबी बंपचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत सक्रीय राहण्याचा प्रयत्न करत असते. सोनम आहुजाला खूप लग्झरी लाइफ जगायला आवडते.दिल्लीतील पाच सर्वात महागड्या घरांपैकी एका घरात ती राहतेय. या घराची किंमत एकूण चक्कर येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमने 2018 साली दिल्लीस्थित बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते. आनंद शाही एक्सपोर्ट्सचे मालक हरीश आहुजा यांचे नातू आहेत. 


घराची किंमत काय?
सोनमला खूप लग्झरी लाइफ जगायला आवडते. मात्र, ती दिल्लीतील पाच सर्वात महागड्या घरांपैकी एका घरात राहते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे घर दिल्लीतील पृथ्वीराज रोडवर आहे, जे 28 हजार 530 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. लॉकडाऊन दरम्यान सोनमने तिच्या घराचा व्हर्च्युअल व्हिडिओ देखील दाखवला होता. हा बंगला 'शेरमुखी बंगला' म्हणून ओळखला जातो. 


एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनमच्या आलिशान घराची किंमत 173 कोटी रुपये आहे. त्यांच्या बंगल्यात अनेक बेडरूम, हॉल, स्विमिंग पूल, कार पार्किंग आणि एक मोठी लायब्ररी आहे.


सोनम कपूर नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने बेबी बंप दाखवणारा एक फोटो पोस्ट केला, जो लोकांना खूप आवडला. तिच्या चाहत्यांनीही या फोटोला भरपूर लाईक आणि कमेंट केल्या आहेत. 


सोनम कपूरने 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून तिच्यासोबत रणबीर कपूरनेही डेब्यू केला होता. याशिवाय सोनमने 'निरजा', 'प्रेम रतन धन पायो' आणि 'संजू' सारखे हिट सिनेमे दिले आहेत.