मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा ८ मे ला विवाहबद्ध झाले. त्यानंतर रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शन पार्टीला बॉलवूडकरांनी उपस्थिती लावली. रिसेप्शनला रणवीर सिंग, शाहरुख खान, सलमान खान, शाहीद कपूर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली आणि धमाकेदार डान्सही केला. सोनम-आनंदच्या रिसेप्शनचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात अनिल कपूरसह रणवीर सिंग, शाहरुख खान, सलमान खान डान्स करताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील एका व्हिडिओत रणवीर सिंगने सोनमचे पती आनंद आहुजाला उचलून घेतले आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानने सोनमचा हात पकडून डान्स करण्यासाठी तिला स्टेजवर आणत आहे. पहा व्हिडिओ...
कपूर कुटुंबाच्या नव्या पिढीतील हे पहिलेच लग्न आहे. सोनम कपूर कुटुंबात सर्वात मोठी आहे आणि तिच्या लग्नात संपूर्ण परिवार अत्यंत खूश दिसत आहे. अनिल कपूरच्या आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या मोठ्या मुलीच्या लग्नात अनिल कपूरने जबरदस्त डान्स केला.



सोनमच्या रिसेप्शनचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. यात रणवीर सिंग, शाहरुख आणि सोनम कपूर डान्स करताना दिसत आहेत.



लग्नानंतर कोणताही ब्रेक न घेता लवकरच सुरु होणाऱ्या कान फेस्टिवलमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.