मुंबई : सोनम कपूर आणि आनंद अहुजा आता नवं दाम्पत्य आहेत. या दोघांचा विवाह आज मुंबईत कविता सिंह यांच्या हेरिटेज बंगल्यात झाला आहे. या बंगल्यात सोनमचं लग्न अतिशय पारंपरिक पद्धतीत पार पडलं आहे. सोनमच्या मेहंदीला अनेक कलाकार उपस्थित होते आणि असेच कलाकार लग्नाला देखील उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमने आपल्या लग्नासाठी खास डिझाइनर अनुराधा वकिल यांचा लाल रंगाचा लेहंगा घालता होता. तर आनंद अहुजा हा बेज कलरच्या शेरवानीमध्ये दिसला. हे दोघेही आपल्या लग्नाच्या कपड्यात अतिशय सुंदर दिसत होते. सोनम कपूरने आपल्या मेहंदीच्या दिवशी अनुराधा वाकिल यांनी डिझाइन केलेला ग्रे पिंक शरारा परिधान केला होता. सोनम कपूर लग्न करत असलेला आनंद अहुजा हा 32 वर्षाचा असून तो दिल्लीतील लोकप्रिय बिझनेसमन आहे. हे दोघेही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तसेच आनंद हा भारतातील पहिला मल्टी ब्रांड स्नीकर बुटीक सुरू करणारा व्यापारी आहे. तसेच आनंदला स्वतःला शूज खूप पसंद आहेत आणि हे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कळत आहे. 



सोनम कपूरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर देखील भरपूर पसंतीला पडत आहेत.



सोनम आणि आनंद सतत कायम एकमेकांसोबत फोटो शेअर करताना दिसले आहेत. फेब्रुवारीत दुबईत झालेल्या सोनम कपूरच्या चुलत भावाच्या मोहित मारवाहच्या लग्नात देखील हे दोघे एकत्र दिसले होते. दिल्लीत राहणारा आनंद अहुजाकडे 173 करोड रुपयांचा बंगला आहे. आनंदचा हा बंगला 3170 स्केवर यार्डच्या प्लॉटमध्ये सेंट्रल दिल्लीत आहे. 900 स्केवर फूट बिल्डप एरियात असलेल्या या बंगल्याला 'शेर मुखी' असं म्हटलं जातं.