आई झाल्यानंतर सोनम कपूरने शेअर केला पोटाचा फोटो; पाहून आश्चर्यचकित व्हाल
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच एका मुलाला जन्म दिला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच एका मुलाला जन्म दिला. यानंतर ती खूप आनंदी आहे. कपूर कुटुंबातही सोनमच्या मुलाच्या जन्मानंतर जल्लोषाचं वातावरण आहे. सोनमच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर स्टेटस शेअर केले आहे.
यामध्ये, अभिनेत्रीने तिच्या प्रसूतीनंतरच्या पोटाचं फॅट फ्लॉंट करताना दिसत आहे. सोनम कपूरने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्री आरशासमोर पोज देताना दिसत आहे. सोनमने प्रसूतीनंतर तिच्या पोटाचे फोटो पोस्ट केले आहेत. प्रेग्नेंसीनंतर सोनममध्ये खूप बदल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये सोनमने ब्लॅक जेगिंग आणि लाँग ओव्हरसाईज शर्ट कॅरी केला आहे. याचबरोबर तिने चष्मा लावला आहे आणि ओपन केसांमध्ये ती गोंडस आई दिसतेय. सोनम कपूरने या व्हिडिओ क्लिपद्वारे सांगितलं आहे की, ती अजूनही तिच्या प्रसूतीचे कपडे परिधान करत आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर तिचं पोट पूर्णपणे आत गेलेलं नाही. व्हिडीओमध्ये सोनम कपूरचं पोट आत गेलं नाही असे म्हणताना दिसत आहे.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 20 ऑगस्टला सोशल मीडियाद्वारे पालक झाल्याची माहिती दिली होती. तिने लिहिलं, आम्हाला माहित आहे की, आमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. त्याचबरोबर सोनमचे वडील अनिल कपूर यांनीही सोशल मीडियावर आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त केला. सध्या तरी सोनम कपूरच्या मुलाचं नाव निश्चित झालेलं नाही. नाना अनिल कपूर यांनी सांगितले होतं की, मुलाचे नाव 'क' अक्षरावरून ठेवलं जाईल. जरी घरी सगळे अजूनही मुलाला सिंबा नावाने हाक मारत असले तरी.