मुंबई : बॉलिवूड स्टार सोनम कपूरच्या लग्नाची गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र लग्नाचा मुहूर्त कधी असेल याची फारच गुप्तता पाळण्यात येत होती. अखेर येत्या 8 मे रोजी बॉलिवूडची ही मसक्कली दिल्लीस्थित उद्योगपती आनंद आहुजाशी विवाहबद्ध होतेय. 


आनंद अहुजासोबत होणार विवाहबद्ध 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम आणि आनंद 8 मेला मुंबईत विवाहबद्ध होणार आहे. गेले अनेक दिवस अनिल कपूर यांच्या घरी सोनम कपुरच्या लग्नाची, संगीत सोहळ्याची तयारी सुरू आहे. 


जान्हवी कपूर, खुशी, अंशुला आणि अर्जुन कपूर सह सोनम कपूरचे सारे कुटुंबीय तिच्या लग्नाच्या तयारीसाठी लागले आहे. कोरिओग्राफर फराह अख्तर सोनमच्या संगीत समारोहाची तयारी करत आहे. आनंद अहुजा आणि सोनम कपूर हे गेले अनेक दिवस रिलेशनशीपमध्ये होते. अखेर ते विवाहबंधनात अडकणार आहेत. आनंद अहुजा हा दिल्लीस्थित बिझनेसमॅन आहे. 


 कपूर आणि अहुजा कुटुंबीय येणार एकत्र 


 अनिल कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करण्यासाठी दोन्ही कुटुंबीय एकत्र आले. अनिल कपूर यांनी मुलगी सोनम कपूरच्या लग्नाची तारीख घोषित करताना हा दिवस आमच्यासाठी गर्वाचा दिवस आहे असे म्हटले आहे. यादरम्यान आमच्या कुटुंबीयाची प्रायव्हसी जपली जाईल अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे.