मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, शिखा तल्सानिया, स्वरा भास्कर आणि करिना कपूर यांचा बहुचर्चित सिनेमा वीरे दी वेडींग आज म्हणजेच १ जूनला प्रदर्शित होणार आहे. बुधवारी या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले. या स्पेशल स्क्रीनिंगला सोनमने पती आनंद आहुजासोबत हजेरी लावली. यावेळी सोनम व्हाईट आणि ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तर आनंदने ब्राऊन रंगाचा सूट परिधान केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिखा तल्सानिया सोनम कपूरचे वडील आणि अभिनेता अनिल कपूर यांच्या सोबत पोज देताना दिसली.



स्वरा भास्करने यावेळी बेबी पिंक रंगाचा ड्रेस घातला होता. मात्र या स्पेशल स्क्रीनिंगला सिनेमातील प्रमुख अभिनेत्री करिना कपूर मिसिंग होती. 



स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध फिल्ममेकर आणि दिग्दर्शक करण जोहर पोज देताना...



निर्माती रिया कपूरही यावेळी सिंपल लूकमध्ये स्पॉट झाली. 



संजय कपूर आपल्या पत्नीसह सोनमच्या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला पोहचला.



अभिनेता राजकुमार रावही यावेळी गर्लफ्रेंड पत्रलेखा सोबत दिसला.



तर जान्हवी कपूर वडील बोनी कपूर यांच्यासह स्पेशल स्क्रीनिंगला पोहचली. ब्लू रंगाची बॅगी जिन्स आणि व्हाईट रंगाचा क्राप टॉपमध्ये ती अत्यंत क्युट दिसत होती.



यावेळे अभिनेत्री ऋचा चड्डा देखील उपस्थित होती.



डेजी शहा ब्लॅक जीन्स टॉपमध्ये दिसली. लवकरच रेस ३ या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल.



इतकंच नाही तर खुशी कपूरही आपल्या बहिण सोनमच्या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी उपस्थित होती. यावेळी खुशीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.