मुंबई : आई श्रीदेवीचं निधन झाल्याने मुलगी जान्हवीसाठी तिचा वाढदिवस अर्थातच दु:खातच जाणार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच तिने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहून भावनांना मोकळी वाट करून दिली होती. या कठिण काळात तिच्यासोबत संपूर्ण कपूर कुटुंब आहे. नेहमीच दूर राहणारा सावत्र भाऊ अर्जुन कपूरही त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्यासोबत होता.



आता जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त तिची चुलत बहीण सोनम कपूर हिने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. सोनमने जान्हवीचा एक फोटो शेअर केला असून तिला स्ट्रॉंगेस्ट गर्ल असं म्हटलं आहे. सोबतच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 





दुसरीकडे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यानेही जान्हवीसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे.