...म्हणून सोनम ठरते सर्वांपेक्षा वेगळी; व्हायरल होणारा `हा` व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल
नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये सोनम कपूर आपल्या लहान ताहान्या बाळाला ब्रेस्ट फीड करताना दिसली.
Sonam Kapoor Instagram Post: अभिनेत्री सोनम कपूरनं या वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. सोनम आणि आनंद यांनी आपल्या मुलाचं नावं वायू असं ठेवलं आहे. सोनम आणि आनंद अहूजाच्या लग्नाला चार वर्षे पुर्ण झाली आहेत. सध्या करवा चौथचा सिझन सुरू आहे. बॉलीवूड सेलिब्रेटींमध्येही सध्या करवा चौथचा ट्रेण्ड जोरात सुरू आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनीही सोशल मीडियावर आपले फोटोही शेअर केले आहेत. याला सोनम कपूरही अपवाद नाही. सोनम कपूरनं आपल्या करवा चौथचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (sonam kapoor shares a new video on instagram baby breast feeding back to mumbai)
नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये सोनम कपूर आपल्या लहान ताहान्या बाळाला ब्रेस्ट फीड करताना दिसली. करवा चौथसाठी तयार होता होता तिनं आपल्या वायूला कडेवर घेतले आणि त्याला दूध पाजताना दिसली. या व्हिडीओवर पती आनंद अहूजानंही कमेंट केली आहे. अशा गोष्टींसाठी तयार राहा, अशी कमेंट त्यानं केली आहे. बॉलीवूडच्या सर्व लोकप्रिय सेलिब्रेटींनी आणि सोनमच्या चाहत्यांनी या व्हिडीओ खूप पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत.
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की सोनम कपूर आपल्या बाळाला ब्रेस्ट फीड करतेय आणि दुसरीकडे तयार होत आहे. मेकअप केल्यावर सोनमनं सुंदर अशी मखमली रेशमाची लाल-हिरवा काठपदराची लेहेंगा - साडी नसली आहे. ज्यात सोनम अत्यंत सुंदर दिसते आहे.
सोनम आणि आनंद अहूजा यांनी खुलासा केला आहे की ते करवा चौथ पाळत नाहीत. परंतु सण आणि परंपरा म्हणून आम्ही त्यात सहभाग घेतो. यासाठी सोनमनंही यावेळी करवा चौथचा उपवास ठेवला नाही. तर करवा चौथच्या दिवशी आनंदसाठी सोनम पारंपारिक वेशात तयार झालेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
सोनमनं शेअर केली पोस्ट -
हा व्हिडिओ शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या टीमसोबत आता मी माझ्या कामाला सुरूवात करते आहे, तयार होत नव्या लोकांना भेटण्यासाठी आणि पुन्हा एकदा काम सुरू करण्यासाठी मी तयार आहे. प्रेग्नंन्सीनंतर परत शुटिंगसाठी आणि कामासाठी मुंबईला परत येणे यापेक्षा दुसरं सुख नाही. लव्ह यू #मुंबई." अशी भावनिक पोस्ट तिनं शेअर केली आहे.