मुंबई : फिल्मी जगतातला हॅंडसम स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फवाद खानने २९ नोव्हेंबरला आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्याच्या असंख्या चाहत्यांसोबतच अभिनेत्री सोनम कपूरने त्याला बर्थ डे विश केले. पण सोनमच्या बर्थ डे विश वर अनेकांनी कमेंट्स करत ट्रोल केले आहे.



 


सोनमने दिल्या शुभेच्छा 



खूबसूरत या सिनेमात फवाद खान आणि सोनम यांनी एकत्र काम केले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा फवाद, या खास क्षणी तुला खूप सारा आनंद आणि यश मिळो, ही सदीच्छा ! असे ट्विट सोनमने केले. 


बर्थ डे विश 


यानंतरही अनेकांनी फवादला बर्थडे विश केले. बॉलिवूडमध्ये पुन्हा येण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. पण काही असेही होते ज्यांनी फवाद आणि सोनमवर जोरदार टीका केली. 


सोनम ट्रोल



काहींनी त्याला दहशतवादी म्हटले, तर काहींनी सोनमला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला.



सोनमचे कोणी बॉर्डरवर राहत नाही म्हणून तिने एका फवादला विश केले. 


विश केले नाही  



 बॉलिवूडच्या बऱ्याचशा सेलिब्रेटींनी फवादला विश केले नाही हेदेखील पाहायला मिळाले.