Sonam Kapoor Leopard Print Shawl Price: सोनम कपूर आपल्या हटके स्टाईलनं आणि फॅशननं सगळ्यांनाच घायाळ करून सोडते. तिचे अनेक चाहते आहेत जे तिच्या फॅशन स्टाईललाही फॉलो करतात. सोनमच्या फॅशनचेही अनेकदा कौतुक होताना दिसते. तिनं परिधान केलेल्या कपड्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते. तिच्या या कपड्यांच्या किमतीचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिनं परिधान केलेल्या शालीची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. तिच्या या शालीची किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही किंमत ऐकून तुम्ही नक्कीच एखादी आलिशान कार नाहीतर घर घ्याल. यावेळी सोनमनं एक सुंदर साडी परिधान केली होती. त्या साडीला मॅचिंग अशी शालही तिनं यावेळी परिधान केली होती. तिच्या या ब्युटिफूल साडीपेक्षा तिच्या शालीचीच अधिक चर्चा रंगली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सोनमनं सुंदर अशी महागडी अॅनिमल प्रिंटवाली शाल परिधान केली होती. तिची ही शाल चित्ताच्या प्रिंटची आहे. कॉपर कलरच्या साडीवर तिची ही शाल जबरदस्त भारी दिसत होती. मुलायम, मखमलीप्रमाणे तिचा आऊटफिट होता. त्यामुळे तिचे सौंदर्य हे लाखात एक असं होतं. 


तुम्हाला जाणून घेऊन धक्का बसेल पण तिनं परिधान केलेली शाल ही Celine या जगप्रसिद्ध ब्रॅण्डची होती. मीडिया रिपोर्टनुसार, या शालीची किंमत ही 5,950 डॉलर म्हणजे 4,88,000 रूपये इतकी आहे. यावेळी साडीच्या पदराला आणि ब्लाऊजला मॅचिंग असे हिरवे डायमंडचे महागडे एयरिंग्स तिने घातले आहेत. सध्या तिच्या या लुकनं सर्वांच्याच नजरा तिच्याकडे खिळल्या आहेत. नेहरू सेंटर लंडन येथे इंग्लंडचे पंतप्रधान यांनी ऑर्गनाईंज्ड केलेल्या इंडिया ग्लोबल फॉरमसाठी UK-India Week साठी सोनमनं ही साडी आणि शाल परिधान केली होती. सोनम कपूरच्या या लुकची खासियत म्हणजे तिनं अगदी रॉयल लुक केला होता. तिनं न्यूड मेकअप आणि अगदी लाईट मेकअप केला होता. सोबतच तिनं यावेळी सुंदर अशी ज्वेलरीही कॅरी केली होती. 


हेही वाचा - Sonu Sood आला अभिनेत्रीच्या मदतीला धावून... अशी कामगिरी केली की कराल पोटभरून कौतुक


सध्या सोनमच्या 'ब्लाईंड' या चित्रपटाच्या ट्रेलरची फार जोरात चर्चा आहे. बऱ्याच अंतरानंतर सोनमचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.



सोनम कपूरचं लंडनमध्येही घर आहे. त्यामुळे अनेकदा ती आपल्या पती आणि लेकरासह लंडनमध्ये असते. मध्यंतरी तिनं आपल्या लंडनच्या घराची टूरही इन्टाग्रामवरून चाहत्यांसाठी दाखवली होती. सोनमनं यावेळी परिधान केलेल्या साडीचीही किंमत मोठी आहे.