मुंबई : सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाची चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनमचे लग्न ७-८ मेला होणार आहे. सुरुवातीला अशी बातमी होती की दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. मात्र आता अशी खबर आहे की लग्न मुंबईत होतंय. या सेलिब्रेशनची अधिक माहिती समोर आलीये. सोनम-आनंदचे लग्न वांद्रेस्थइत हेरिटेज हवेलीमध्ये होतेय. 


आधी डेस्टिनेशन वेडिंगचा प्लान मात्र...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दोघंही डेस्टिनेशन वे़डिंग करणार होते. माज्ञ सोनमच्या आजीमुळे त्यांना हे ठिकाण बदलावे लागले. आता तिचे लग्न घराच्या जवळच असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोनम-आनंद यांचे लग्न कविता सिंह यांच्या वांद्रेस्थित हेरिटेज हवेलीमध्ये होणार आहे. ५५,००० स्क्वे फीटच्या या प्रॉपर्टीमध्ये हे लग्न होणार आहे. 


लग्नात तीन फंक्शन


सोनमच्या लग्नात तीन मोठे फंक्शन असणार आहे. यात मेहंदी, संगीत आणि लग्न असणार आहेत. संगीत सेरेमनी सोनमची बेस्ट फ्रेंड संयुक्ता नायरच्या फाईव्ह स्टार हॉटेल द लीलामध्ये होणार आहे. फराह खान संगीत फंक्शन कोरियोग्राफ कऱणार आहे. अनिल कपूर, सुनीता कपूर, करण जोहर आणि अर्जुन कपूर यांचा स्पेशल डान्स परफॉर्मेंस असणार आहे.


मेहंदी फंक्शन ३५ कोटींच्या अलिशान ड्युप्लेक्स अपार्टमेंटध्ये होणार आहे. हे अपार्टमेंट ७ हजार स्क्वे फीटचे आहे.