मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर झगमगत्या विश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे. काही कलाकारांसाठी बॉलिवूडपर्यंतचा प्रवास फार खडतर होता. असे अनेक अनुभव स्टारकिड्सना देखील आले आहेत. पैशांच्या आभावी बॉलिवूड  सुपपस्टारच्या मुलांवर हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ आली. बॉलिवूड सुपरस्टारची मुलगी दुसरी तिसरी कोणीही नाही तर अभिनेत्री सोनम कपूर आहे. सोनमने 'सावरिया' सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. पण त्या आधी तिने हॉटेलमध्ये काम केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत खुद्द सोनमने याबद्दल खुलासा केला आहे. 10वी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी सोमन सिंगापूरला पोहोचली होती. तेव्हा सोनमला खर्चासाठी कमी पैसे मिळायचे. त्यामुळे परदेशात आपला खर्च भागवण्यासाठी तिने सोनमने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. 



एवढंच नाही तर, अभिनेत्रीने असेही सांगितले की पैशासाठी तिने चाचा चार्ली नावाच्या रेस्टॉरंटमध्ये एक आठवडा वेटरची नोकरी केली. मात्र, तिचे शाळेचे दिवस आठवून अभिनेत्रीने सांगितले की, ती जास्त काळ वेटरचे काम करू शकत नाही. तेव्हा वेटरचं काम करणारी सोनम आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 


2005 मध्ये जेव्हा सोनम कपूरने संजय लीला भन्साळीच्या 'सावरिया' सिनेमातून रणबीर कपूरसोबत पदार्पण केले तेव्हा लोक तिच्या सौंदर्याकडे बघतच राहिले. त्यानंतर सोनमने अभिषेक बच्चनसोबत 'दिल्ली-6', 'आय हेट लव्ह स्टोरीज', 'आयशा', 'रांझना', 'वीरे दी वेडिंग' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले. आता लवकरचं ती 'द झोया फॅक्टर' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.