मुंबई: जवळपास आठ वर्षांपूर्वी माझा अगडबम हा चित्रपच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनात एका पात्राने अगदी कायमचं घर केलं होतं. ते पात्र म्हणजे नाजुकाचं. त्यामुळे आता हीच नाजुका पुन्हा एकदा 'माझा अगडबम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोदी कथाकाच्या या चित्रपटातील 'अटकमटक' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यामागोमाग आता 'माझा अगडबम'मधील आणखी एक गाणं सर्वांचं लक्ष वेधत आहे.


‘प्रीती सुमने’ असे या गाण्याचे बोल असून सुबोध भावे आणि तृप्ती भोईर यांच्यावर ते चित्रीत करण्यात आलं आहे.  



या गाण्यातून नाजूका आणि तिचा पती रायबा यांच्या नात्याची सुरेख झलक पाहायला मिळत आहे.   


सर्वसामान्य प्रेमीयुगूलांपेक्षा अगदी हटके असणाऱ्या या जोडीची प्रेमछटा दाखवणारं 'प्रीती सुमने' हे गाणं मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर, टी. सतीश चक्रवर्ती यांनी या त्याला संगीत दिलं आहे.  कलाकारांच्या कलेचा सुरेख नमुना असणारा हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.