Sonu Sood Neha Dhupia: सोनू सुद हा अभिनेता फारच लोकप्रिय आहे. तो त्याच्या हटके अभिनयासाठी आणि त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयानं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा होताना दिसते. कोविड काळात त्यानं अनेक लोकांना आणि कलाकारांना मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे जितके कौतुक झाले तितकेच किंवा त्याही पेक्षा जास्त कौतुक हे त्याच्या या समाजकार्याचे झाले. सोशल मीडियावरही त्याच्या अभिनयाचे आणि या कामाचे प्रचंड प्रमाणात कौतुक करण्यात आले होते. कलाकारांना तो आताही मदत करताना दिसतो. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या मदतीसाठी सोनू सूद धावून आला आहे. ही अभिनेत्री आहे लोकप्रिय टेलिव्हिजन आणि फिल्मस्टार अभिनेत्री नेहा धुपिया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी नेहा धुपियाला वेगळ्याच एका संकटाचा सामना करावा लागला होता. नेहानं ट्विटरवरून एक माहिती शेअर केली होती ज्याद्वारे तिनं घडलेल्या घटनांची माहिती दिली. यावेळी ती आपल्या मुलांसह इंडिगो एअरलाईन्सनं ट्रॅव्हल करत होती. तेव्हा तिला काही अडचणी आल्या जसं की तिची फ्लाईट फारच लेट येत होती. अशावेळी तिनं याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकांऊटववरून दिली आणि त्यानंतर तिच्या मदतीला सोनू सूद धावून आला होता. 


यावेळी नेहा धुपियानं लिहिलं की, मी माझ्या परिवारासह आणि माझ्या दोन मुलांसह प्रवास करते आहे. परंतु मला एअरलाईन्सकडून सारखे सारखे मेसेज येत आहेत की फ्लाईट डिले होणार आहे. सध्या जो मौसम बाहेर आहे त्यावरून असे दिसून आले आहे की सध्या एअरपोर्टवरील वातावरण काही चांगले नाही. मी सतत एअरपोर्टवरील लोकांशी संपर्क साधते आहे. परंतु मला त्यांच्याकडून काहीच रिप्लाय मिळत नाहीये. मी माझ्या टिकटाचा नंबर येथे लिहिते आहे. तेव्हा त्यासंदर्भात मला कृपया माहिती द्या. त्याचबरोबर मला आज काहीकरून माझ्या फॅमिलीसोबत आज प्रवास करायचाच आहे.  


हेही वाचा - रामचरणच्या मुलीचं बारसं! आजोबा चिरंजीवी यांनी सांगितलं नावं; Photo व्हायरल



यावर सोनू सूदनं रिप्लायही दिला आहे की त्याच्या रिप्लायवरून कळते की त्यानं तिला मदत केली आहे. तिनं दुसऱ्या एका रिप्लायमध्ये असं म्हटलंय की, पुनम डोंग्रेवधाना तुझे आभार. नितेश आणि मोईन तुमचेही आभार इतकी सेफ फ्लाईट दिल्याबद्दल. एअरलाईनही आम्हाला मदत करते आहे. सोनू सुद हा मोस्ट रिलायबल हेल्पलाईन आहे. त्यावर सोनूनं म्हटलंय की, कधीही आणि कुठेही मी कायमच उपलब्ध असेन. सध्या त्यांचे हे संभाषण व्हायरल झाले आहे.