Chiranjeevi Grand Daughter Name: रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या घरी लाडक्या लेकीचे आगमन झाले आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेता रामचरण यानं आपल्याला मुलगी झाली असल्याची बातमी जाहीर केली होती. त्यानंतर त्याच्या चाहत्यांना कोण आनंद झाला होता. लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. काही दिवसांपुर्वी आपल्या लेकीसह आणि आपली पत्नी उपासना यांच्यासह रामचरण स्पॉट झाला होता. डिलिव्हरीनंतर उपासना यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर रूग्णालयाच्या बाहेर ते तिघंही स्पॉट झाले होते. यावेळी त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आपल्याला येऊ शकते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे रामचरण यांच्या लेकीच्या नामकरण सोहळ्याची. सध्या त्यांच्या लाडक्या लेकीच्या बारश्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
क्लिन कारा कोनिडेला असं रामचरण आणि उपासना यांच्या मुलीचं नावं ठेवलं आहे. आजोबा चिरंजीवी म्हणजेच राम चरण यांच्या वडिलांनी आपल्या लाडक्या नातीचे नावं सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर रामचरणच्या मुलीच्या बारश्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे. हैद्राबाद येथे राम चरणच्या मुलीचा भव्य नामकरण समारंभ पार पडला होता. मुलीचे हे नावं ललिता सहस्त्रनाम या हिंदू ग्रंथावरून प्रेरित आहे. चिरंजीव यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ''आणि बाळाचं नाव आहे, 'क्लिन कारा कोनिडेला'. हे नावं ललिता सहस्त्रनामातून घेतले आहे. 'क्लिन कारा'चा अर्थ असा की हे निसर्गाचे मूर्त स्वरूप आहे. देवी माता 'शक्ती'च्या सर्वोच्च शक्तीला ते सामील करून घेते. त्यात एक शक्तिशाली वलय आणि कंपन आहे.''
हेही वाचा - ''तू काय वेडी आहेस का?'' 'गदर 2' चा सस्पेन्स अमिषा पटेलकडून उघड; नेटकरी संतापले
त्यांनी पुढे लिहिलंय की, ''आपल्या सर्वांना खात्री देतो की ही लहान मुलगी, राजकुमारी हे तिच्या व्यक्तिमत्त्वात हे सर्व गुण आत्मसात करेल. ती जसजशी मोठी होईल, हुशार होईल त्याप्रमाणे ती वेगळ्या रूपात आपल्या समोर येईल.'' सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे तिच्या या नामकरण सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांचे कौंटुबिक फोटोही चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावेळी कुटुंबियांनी पारंपारिक पद्धतीनं पोशाख परिधान केले होते.
14 जून 2012 साली उपासना आणि रामचरण यांचे लग्न झाले. डिसेंबर 2022 मध्ये उपासनानं आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली. याच महिन्यात 20 जून रोजी त्यांना कन्यारत्न झाले. यावेळी रामचरण आणि उपासना यांनाही चाहत्यांचे आभार मानले आहेत.