मुंबई : लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आलेला बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदच्या( Sonu Sood) घरी बुधवारी आयकर विभागाची टीम पोहोचली होती. कोरोना दरम्यान अनेकांना मदत करणारा सोनू सूद आज अनेकांना त्याच्या सामाजिक कामांमुळे माहित आहे. सोनू सूदकडे कोणीही मदतीसाठी जातो तर तो रिकाम्या हाती परत येत नाही. सोनू सूद अनेकांना मदत केली आहे. पण जेव्हा सर्वेचा भाग म्हणून आयकर विभागाची टीम (Income Tax)अभिनेत्याच्या घरी पोहोचली तेव्हा ही बातमी झपाट्याने लोकांमध्ये पसरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाच्या या सर्वनंतर आता सोनू सूदची संपत्ती किती हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, सोनू सूद जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे फक्त 5 हजार 500 रुपये होते. पण आज मात्र तो तब्बल 130 कोटींचा मालक आहे.


एका रिपोर्टनुसार, अभिनेता सोनू सूदकडे सप्टेंबर 2021 पर्यंत 130 कोटींची संपत्ती होती. अभिनेता सोनू सूदने हिंदी शिवाय दाक्षिणात्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तेलुगू, पंजाबी आणि कन्नड चित्रपटांत त्याने अभिनयाने त्याचा वेगळा फॅन फॉलोअर बनवला आहे. एका चित्रपटासाठी सोनू सूद तब्बल 2 कोटी रुपये घेतो.


चित्रपटांमध्ये विलनच्या भूमिका साकारणारा हा अभिनेता आज रिअर लाईफ हिरो ठरला आहे. त्याचं स्वत:चं शक्ती सागर प्रोडक्शन हाऊस देखील आहे.  कारण हे नाव सोनुने आपल्या वडिलांच्या नावावरून ठेवलं आहे. 


अभिनेता सोनू सूदचं जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. सोनू सूदकडे मर्सिडीज, ऑडी, पोर्शे पनामासारख्या गाड्यांचं कलेक्शन आहे.