मुंबई : कोविडमुळे देशात सर्वत्र खूप अस्वस्थ परिस्थिती आहे. गेल्या वर्षीपासून संपूर्ण जग या विषाणूविरूद्ध लढत आहे. सोनू सूद गेल्या वर्षापासून गरजू लोकांना मदत करत आहेत. त्यांनी अनेक परप्रवासी कामगारांना घरी सुखरुप पोहचवलं आहे. अनेक भुकेल्या लोकांना अन्न पुरवलं आहे, अने गरजूंना पैसे दिले, तर काही मुलांची फी भरली. विषाणूमुळे देशाची सद्यस्थिती पाहून सोनू नुकताच असं म्हणाला ज्यावरून असं दिसून येतंय की, तो खूप दु: खी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू म्हणाला की, सध्या जगाची परिस्थिती पाहता, त्याचे पालक हे सगळं पाहण्यास जिवंत नाहीत. ते योग्य वेळीच निघून गेले हे बरं झालं. अशा परिस्थितीत, भरपूर लोकं बेड आणि ऑक्सिजन सिलिंडरसाठी लढत आहेत हे पाहून माझं काळीज तुटत आहे.


सोनू पुढे म्हणाला की, मी बर्‍याच लोकांना तुटलेलं, रडताना पाहिलं आहे. हे सर्व पाहून मी घाबरलो आहे. यापेक्षाही वाईट अजून काय पाहू शकतो. आई-वडिलांविषयी बोलताना सोनू म्हणाला, 'मी आणि माझे वडील पंजाबमध्ये माझ्या दुकानाजवळ जेवण वाटायचो आणि इतरांना मदत करायचो. तर माझी आई गरीब मुलांना विनामूल्य शिकवायची.


या कठीण दिवसांत स्थलांतरित मजुरांनी सोनूला आनंदाचा खरा अर्थ सांगितल्याचंही सोनूने म्हटलं आहे. सोनू म्हणला की, सर्व नेत्यांनी हा खेळ थांबवावा लागेल आणि एकत्र येवून या विषाणूचा सामना करावा लागेल.


ट्रोलर्सना दिलं योग्य उत्तर
सोनूच्या मदतीचं कार्य पाहून बरेच लोक त्याच्याबद्दल नकारात्मक बोलतात. मात्र, सोनू या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि सर्वांना मदत करण्यात मग्न असतो. नुकताच सोनूने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, तो आपला वेळ ट्रोलर्सवर वाया घालवत नाही कारण त्याला माहित आहे की, यात काहीच सत्यता नाही. यामुळे तो या सगळ्यात पडण्यापेक्षा लोकांचं बहुमोल जीवन वाचवण्यावर सतत भर देत असतो.


प्रोफेशनल लाईफ
सोनूच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचं झाल्यास, तो आता ई निवास दिग्दर्शित 'किसान' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय चिरंजीवी स्टारर आगामी तेलगू चित्रपट 'आचार्य' मध्येही तो दिसणार आहे.