Free Covid Help : सोनू सूद आणखी एक पाऊल पुढे, सर्वसामान्यांची फ्री कोरोना चाचणी करणे सुरु
२०२० पासून सोनू सूदने स्वत: ला पूर्णपणे समाजसेवेत व्यस्त केलं आहे
मुंबई : सोनू सूदने कोरोनामुळे डॉक्टरांवर चिडचिड करणाऱ्या लोकांसाठी आणि जी लोकं पैसे भरुन चाचणी करु शकत नाहीत त्यांच्यासाठी मदतीचा एक नवीन पुढाकार घेतला आहे. या चाचण्या विनामूल्य केल्या जातील. सोनूने आज ट्विटरवरुन याची घोषणा केली आहे.
सोनू सूद कोरोनामधील लोकांना सतत मदत करत आहे. नुकतीच त्याने स्वत: कोरोनावर मात केली आहे. या मदतीसाठी त्याने दोन संस्थांशी देखील हातमिळवणी केली आहे. एकाचं नाव Healwell24 तर दुसऱ्यांच नाव आहे krsnaa डायगनोस्टिक्स.
सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशाला, लोकांना, प्रत्येक घरात, खूप त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना तपासणीत समस्या येत आहेत तर अनेकांना औषध मिळत नाहीत.
तर दुसरीकडे कोणी हॉस्पिटलमध्ये बेडसाठी झगडत असेल तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बरेच लोक मरत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट भारतात अधिक विनाशकारी असल्याचं दिसून येत आहे.
सध्या सगळीकडेच आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अशा परिस्थितीत लोक एकमेकांना मदत करत आहेत आणि संस्था देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. सोनू सूदची संघटनाही यापैकी एक आहे.
सोनू सूदने त्याच्या संस्थेची स्थापना सूद फाउंडेशनच्या माध्यमातून केली आहे. मार्च २०२० पासून सोनूने स्वत: ला पूर्णपणे समाजसेवेत व्यस्त केलं आहे आणि तो सगळ्या प्रकारे सगळ्यांच्या मदतीला धावुन जात आहे
लोकं कोरोनामुळे कंटाळली आहेत. कुणाला काम मिळत नसेल, एखाद्याला शस्त्रक्रिया आवश्यक आहे किंवा एखाद्याला त्याच्या व्यवसायात मदतीची गरज आहे. तर सोनू सूदला लोकं ऑनलाइन पद्धतीने मदतीसाठी विचारतात आणि सोनू देखील त्याला जमेल तशी मदत लोकांना करतो
सोनूच्या समाजसेवेची चर्चा आता भारतातच नाही तर जगभरात होत आहे. तो आता भारतीय माध्यमांमध्येही हिरो बनला आहे. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने अलीकडेच त्याच्या कामगिरीची स्थुति केली आणि त्याची कामगिरी कव्हर देखील केली...
या समाजसेवेमुळे सोनूचं संपूर्ण जगात एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. त्याच्या कार्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. आपल्या करिअर व्यतिरिक्त सोनू समाजसेवेसाठी आपल सगळं पणाला लावतो.