मुंबई : २०२० या वर्षात सर्वांनीच अनेक संकटांचा सामना केला. कोरोना व्हायरसचा फटका सर्व सामान्य जनतेपासून मोठ्या सेलिब्रिटींना देखील बसला. या महामारीच्या काळात प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला. पण अभिनेता सोनू सूदने मात्र अनेकांची मदत केली. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमीका साकारणार सोनू कोरोना काळात मात्र सामान्य जनतेसाठी हिरो ठरला. सध्या सोनू एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने अभिनेत्री कंगना रानौतवर नाव न घेता निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलिवूडमधील 99 टक्के लोक मादक पदार्थांचे सेवन करतात.' कंगनाच्या या वक्तव्यावर सोनूने प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मला या गोष्टीमुळे अत्यंत दुःख झालं आहे. जेव्हा बॉलिवूडमधील लोकच बॉलिवूडविषयी काही वाईट बोलतात तेव्हा भावना दुखावल्या जातात.' असं सोनू म्हणाला. 


इंडस्ट्रीमध्ये आम्ही सर्व एक कुटुंब आहोत असं म्हणत सोनू म्हणाला या इंडस्ट्रीमध्ये अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. बॉलिवूडने अनेकांना नाव, समृद्धी मिळवून दिली आहे. ऐकेकाळी सोनू आणि कंगना चांगले मित्र होते. मात्र 2018 पासून त्यांच्यात वाद सुरू आहेत.