मुंबई : रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या आगामी 'सिम्बा' चित्रपटामधील कलाकारांची नावं जाहीर होण्यास सुरूवार झाली आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर अभिनेता आर. माधावनने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता त्याच्या जागी कोण येणार ? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आला असेल तर आता तुमच्या मनातील या प्रश्नाला उत्तर मिळाले  आहे.  


आर. माधवनच्या जागी सोनू सुद  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या चित्रपटामध्ये आर. माधवनच्या जागी सोनू सुद झळकणार आहे. सोनू सुद हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनू सूद विरोधात अभिनेता रणवीर सिंह उभा ठाकणार आहे. रणवीर सिंह पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेत त्याचं नाव  संग्राम भालेराव आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या रिहर्सल सुरू होणार आहे. 28 डिसेंबर  2018 ला हा चित्रपट रीलिज होणार आहे. ... म्हणून आर. माधवनच्या हातातून गेला रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा


सोनू पुन्हा दिसणार खलानायकाच्या भूमिकेत  


सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटामध्ये अभिनेता सोनू सुद खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. आता पुन्हा सोनू सुद खलनायक साकारणार आहे. या चित्रपटासाठी खूप 'होमवर्क' करावा लागणार आहे. असे सोनूने  म्हटले आहे. 


करण जोहरनं केली घोषणा  


दिग्दर्शक करण जोहरने 'सिम्बा'मधील अभिनेत्रीचं नाव सोशल मीडियामध्ये घोषित केले आहे मात्र या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींची नावं शर्यतीमध्ये होती. दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर, आलिया भट्ट पासून अवघ्या काही दिवसांपासून इंटरनेट सेन्ससेशन ठरलेली प्रिया प्रकाशचं नावदेखील चर्चेमध्ये आलं होतं. मात्र आता या सार्‍यांवर मात करून सैफ अली खानची मुलगी साराची वर्णी लागली आहे.