... म्हणून आर. माधवनच्या हातातून गेला रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा

बॉलिवूडमध्ये अजरामर राहणार्‍या रोमॅन्टिक अभिनेत्यांपैकी  एक म्हणजे आर. माधवन. 

Updated: Mar 26, 2018, 03:47 PM IST
... म्हणून आर. माधवनच्या हातातून गेला रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा

मुंबई : बॉलिवूडमध्ये अजरामर राहणार्‍या रोमॅन्टिक अभिनेत्यांपैकी  एक म्हणजे आर. माधवन. काही दिवसांपूर्वी आर माधवनने हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता आलेले ट्विट पाहून त्याच्या चाहत्यांसाठी अजून एक वाईट बातमी पुढे आली आहे. आर माधवनने आता 'सिम्बा' चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे.  

आर. माधवनच्या खांद्यावर शस्त्रक्रिया  

काही दिवसांपूर्वी आर. माधवनच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यावेळे हळूहळू गाडी मूळपदावर येत आहे अशा आशयाचं एक ट्विट त्याने लिहलं आहे. मात्र खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर आता आर. माधवनने 'सिम्बा चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं म्हटलं आहे.   

आर माधवनचं खास ट्विट 

ट्विटरच्या माध्यमातून माहिती देताना आर. माधवन म्हणाला, मी आणि माझा मुलगा दोन्ही रोहित शेट्टीच्या चित्रपटाचे फॅन्स आहोत. मात्र माझ्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे मात्र आता मला रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटातून काढता पाय घ्यावा लागला आहे. या गोष्टीचं मला खूप दु:ख झालं आहे. परंतू हाताच्या दुखापतीतून मात्र मी  बाहेर पडत आहे. असे त्याने ट्विटमध्ये लिहलं आहे. 

 

'सिम्बा'मध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत 

रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या आगामी 'सिम्बा' चित्रपटामध्ये रणवीर सिंह एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेत त्याचं नाव  संग्राम भालेराव आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या रिहर्सल सुरू होणार आहे. 28 डिसेंबर  2018 ला हा चित्रपट रीलिज होणार आहे. 

करण जोहरनं केली घोषणा  

दिग्दर्शक करण जोहरने 'सिम्बा'मधील अभिनेत्रीचं नाव सोशल मीडियामध्ये घोषित केले आहे मात्र या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींची नावं शर्यतीमध्ये होती.  

दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर, आलिया भट्ट पासून अवघ्या काही दिवसांपासून इंटरनेट सेन्ससेशन ठरलेली प्रिया प्रकाशचं नावदेखील चर्चेमध्ये आलं होतं. मात्र आता या सार्‍यांवर मात करून सैफ अली खानची मुलगी साराची वर्णी लागली आहे.