मुंबई : बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांचा सुर्यवंशम हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. सेट मॅक्सवर हा चित्रपट इतक्या वेळा दाखवण्यात आला आहे की, टीव्ही चॅनेलच्या नावापासून,चित्रपटांचे डायलॉंग देखील प्रेक्षकांना तोंडपाठ झालेत.त्यामुळे या चित्रपटाची एक वेगळीचं क्रेझ आणि वेगळाचं प्रेक्षकवर्ग निर्माण झालाय. सतत एका चॅनेलवर दाखवण्यात आलेल्या या सिनेमामुळे या चित्रपटाच्या कराराबाबत चर्चा सुरु झालीय. खरचं या चित्रपटाचा सेट मॅक्ससोबत 100 वर्षाचा करार आहे का? की इतर काही कारण आहे? हे जाणून घेऊयात...  
  
सेट मॅक्स टीव्ही चॅनेलचं नाव घेतलं तर सूर्यवंशम या चित्रपटाचं नाव तोंडी येतचं. कारण सर्वांत जास्त वेळ या चॅनेलवर दाखवणारा हा एकमेव चित्रपट आहे.तसेच या चित्रपटाचं नाव जरी घेतलं तरी चित्रपटाचे डायलॉंग प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या सिनेमाल रीलीज होऊन 23 वर्ष पुर्ण झालेत.मात्र तरीही आजही प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ कायम आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 मे 1999 साली 'सूर्यवंशम' प्रदर्शित झाला. यावर्षी 21 मे 2022 रोजी 'सूर्यवंशम' चित्रपटाला रिलीज होऊन 23 वर्षे पूर्ण झाली आहेत.  या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डबल रोल केला होता. मुलगा आणि वडिल या दोन्ही भूमिका त्यांनी स्वत: केल्या होत्या. अमिताभ यांच्यासोबत सौंदर्या, अनुपम खेर, कादर खान, जयसुधा, मुकेश ऋषी असे सह कलाकार होते. ७ कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास १२ कोटी ६५ लाख रुपये कमाई केली होती. 


चित्रपटाच्या करारात काय? 


अमिताभचा 'सूर्यवंशम' 1999 साली रिलीज झाला होता. त्यावेळेस सेट मॅक्स हा चॅनेल नवीनचं लॉंच झाला होता. मीडिया रिपोर्ट्नुसार सोनी मॅक्सने  'सूर्यवंशम' चे राइट्स 100 वर्षासाठी खरेदी केले होते.म्हणूनच हा चित्रपट सेट मॅक्सवर सतत दाखवला जात आहे.  


गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सचे संचालक मनीष शाह यांनी सांगितले की, सोनी मॅक्सकडे फक्त 2024-25 पर्यंत 'सूर्यवंशम'चे हक्क आहेत. हा करार संपल्यानंतर आता तो या चित्रपटाचे हक्क कुणालाही विकणार नाही, तर तो आपल्या टीव्ही चॅनल 'ढीचॅंक बॉलिवूड'वर चालवणार आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅनलने या चित्रपटातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.