मुंबई: 'करायला गेले एक आणि घडले भलतेच', अशी एक म्हण आपल्याकडे आहे. या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय सोनी पिक्चर्सला नुकताच आला. 'खली द किलर' नावाचा चित्रपट घेऊन सोनी पिक्चर्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीप्रमाणे या चित्रपटाचे प्रमोशन धुमधडाक्यात होणार यात काहीच शंका नव्हती. त्यामुळे सोनीकडून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. पण, नेमकी ट्रेलर रिलीज करताना एक नजरचूक घडली आणि ती निस्तारता निस्तारता सोनीची चांगलीच धावपळ उडाली.


ट्रेलरच्या नावाखाली संपूर्ण चित्रपट रिलीज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचे झाले असे, खरे तर सोनीला 'खली द किलर'चा ट्रेलर रिलीज करायचा होता. त्यानुसार त्यांनी तो केलाही. पण, घडले असे की, नजरचुकीने जो ट्रेलर रिलीज झाला तो ट्रेलर नसून, संपूर्ण चित्रपटच होता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ट्रेलरच्या नावाखाली संपूर्ण चित्रपट रिलीज झाला. नजरचुकीने घडलेल्या या प्रकाराबाबत एंटरटेनमेंट न्यूज वेबसाईट सीबीआर. कॉमने सर्वात आधी वृत्त दिले. सीबआरच्या वृत्तानुसार आता हा चित्रपट संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे. ३ जुलैला हा चित्रपट अपलोड करण्यात आला होता.


लोकांनी संधीचा फायदा उठवत पूर्ण चित्रपट पाहिला


सोनी पिक्चर्सला नामांकीत संस्थेपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा लोकप्रिय आणि नामांकीत संस्थेकडून अशी चूक घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हॉलिवुड रिपोर्टच्या वृत्तानुसार, ८९ मिनीटे ४६ सेकंदांचा हा चित्रपट ३ जुलैला युट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आली. तसेच, सुमार ८ तास इतका प्रदीर्घ काळ हा चित्रपट संकेतस्थळावर होता. काही लोकांनी या संधीचा फायदा उठवत पूर्ण चित्रपट ऑनलाईन पाहिलासुद्धा.


चित्रपट ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला


दरम्यान, येत्या ३१ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  जॉन मॅथ्यू हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तर, रिचार्ड कॅबराल यांनी चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साखारली आहे.