नजरेने घायाळ होणारा `तो` तरूण कोण?
गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा तो व्हिडिओ.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा तो व्हिडिओ.
आता प्रत्येकाच्याच टाईम लाईनवर आहे. नजरेने घायाळ करणारी जशी ती लोकप्रिय होत चालली आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या लाजण्याने मुलींना घायाळ करणारा तो देखील लोकप्रिय ठरत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्याही चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
'मनिक्य मलरया पूवी' हा व्हिडिओ मल्याळम चित्रपट 'उरू अदार लव ( Oru Adaar Love ) मधील आहे. प्रिया प्रकाश वरियर हे नाव जसं आता प्रत्येकाच्या ओठावर आहे. तसंच आणखी एक नाव प्रेक्षकांच्या पसंतीला पडलं आहे. आणि ते म्हणजे या व्हिडिओतील नायक.
मुलींना आपल्या लाजण्याने प्रेमात पाडणार कोण आहे हा?
तिच्या हसण्याने घायाळ झालेल्या त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून अनेकांच्या मनात काही आठवणीसुद्धा जाग्या झाल्या आहेत.
1) मोहम्मद रोशन किंवा रोशन अब्दुल रहूफ असं या तरूणाचं नाव आहे
2) सोशल मीडियावर हा तरूण अभिनेता बऱ्यापैकी सक्रिय आहे.
3) मल्याळम चित्रपट 'उरू अदार लव ( Oru Adaar Love ) या सिनेमातील दोघे कलाकार
4)रोशन उत्तम थिएटर अभिनेता असून तो अनेक स्टेजवर परफॉर्म करताना दिसला आहे.
5) D3 या रिअॅलिटी शोमध्ये तो आपल्या उत्तम कलाकृतीसाठी अभिनेत्री शोभनाकडून सन्मानित झाला आहे.
6) रोशन सोशल मीडियावर सक्रिय असून त्याने अनेक कॉमेडी व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.
7) अभिनयाबरोबरच रोशन उत्तम डान्सर आणि गायक देखील आहे.
8) 'उरू अदार लव' हा सिनेमा 3 मार्चला होतोय प्रदर्शित
प्रियाचा हा डेब्यू सिनेमा
मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर या सिनेमातून डेब्यू करत आहे. 18 वर्षाच्या प्रियाने आपल्या सुंदर अदांनी साऱ्यांनाच घायाळ केलंय. आणि सोशल मीडियावर विशेष पसंती मिळवली आहे. आता ती त्रिशूरच्या विमला कॉलेजमधून बी कॉम करत आहे. या सिनेमाला उमर लूलूने दिग्दर्शित केलं असून तो या सिनेमाचा लेखक देखील आहे. शान रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे.