Kamal Haasan Movie Success: हिंदी भाषिक आणि दाक्षिणात्य कलाजगतावर पकड असणाऱ्या कलाकांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेते कमल हासन (Kamal Haasan). कलाविश्वाकडून राजकीय वर्तुळामध्ये पाऊल ठेवणारा हा चेहरा. ठामपणे आपल्या भूमिका मांडणारं एक व्यक्तीमत्त्वं. (South indian Actor Kamal Haasan debt Movie Success)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलेशी हासन यांचं असणारं नातं शब्दांतही व्यक्त न करता येणार असंच. असे कमल हासन या घडीला प्रचंड आनंदात आहेत. बऱ्याच काळानंतर त्यांचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. त्यांच्या आनंदाला हे एकच कारण पुरेसं आहे. 


'विक्रम'(Vikram) ला मिळालेल्या यशानंतर आता हासन यांच्या नशीबानं पुन्हा चांगल्या दिवसांची वाट धरली आहे, असं ते स्वत:च एका मुलाखतीत म्हणाले. 


चित्रपटानं ओलांडला कमाईचा 300 कोटींचा आकडा 
कमल हासन, विजय सेतुपती, फहाद फसिल यांच्या भूमिका असणारा लोकेश कनगराज दिग्दर्शित 'विक्रम'(Vikram) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या कलाकृतीला उत्स्फूर्त दाद दिली. परिणामी चित्रपटाच्या कमाईचे आकडे प्रचंड फरकानं वाढू लागले. 


अगदी सहजपणे या चित्रपटानं 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अवघ्या 11-12 दिवसांमध्येच चित्रपटानं जागतिक स्तरावर 322 कोटी रुपये कमवले. 


कमाईचा चढता आलेख पाहता हासन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आताची वेळ अशी आहे, जेव्हा मी माझ्यावर असणारं सर्व कर्ज फेडू शकतो. मनाजोगं काम करु शकतो. कुटुंब आणि मित्रांनाही आनंदात पाहू शकतो. 


हासन यांचे हे उदगार पाहता त्याच्यावर असणारा कर्जाचा बोजा मोठा होता हेच स्पष्ट होत आहे. दरम्यान, कर्जाचा आकडा मात्र समोर येऊ शकला नाही.


हासन यांनी आपल्या चित्रपटाला मिळालेलं यश पाहता त्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. रोलेक्सची घड्याळं, महागड्या कार, बाईक अशा भेटवस्तू त्यांनी कलाकारांसह 13 सहाय्यक दिग्दर्शकांनाही दिल्या आहेत. हे त्यांचं मोठेपणच, नाही का?