मुंबई : हिंदी कलाविश्वाप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपट विश्वाचीही लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. दमदार चित्रपट आणि तितकेच दमदार कलाकार यांच्या बळावर या चित्रपटांना लोकप्रियता मिळाली. अशा या चित्रपटांमधील एक चेहरा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉडेलिंगमधून या झगमगणाऱ्या विश्वात पदार्पण करणारा हा चेहरा म्हणजे अदिती आर्या. फेमिना मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड म्हणून ओळखली जाणारी अदिती लवकरच ‘`८३’ या बहुचर्चित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ज्यामध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. यापूर्वी तिने दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत चांगलंच नाव कमवलं आहे.  "सेव्हन", "आयएसएम" आणि "कुरुक्षेत्र" या चित्रपटांतून ती झळकली होती. तर,  "तंत्र" आणि "स्पॉटलाईट" या वेब सीरिजमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 


'`८३' या चित्रपटात संधी मिळाल्याबद्दल तिने आनंदही व्यक्त केला. सोबतच कबीर खानसोबत काम करण्याच्या संधीबद्दलही तिने कमालीचा अभिमान आणि आनंद वाटत असल्याची भावना व्यक्त केली. शिवाय ही एक अभिमानाची बाब असल्याचंही तिने सांगितलं. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत


रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोणही झळकणार आहे. त्याशिवाय, पंकज त्रिपाठी, साकीब सलीम, बोमन इराणी आणि अनेक कलाकार दिसणार आहेत.