मुंबई : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांना अनेकदा धाडसी निर्णय घ्यावे लागतात. अर्थात प्रत्येक वेळी ते निर्ण स्वागतार्ह असतातच असं नाही. पण, या निर्णयांची चर्चा होते हेसुद्धा तितकंच खरं. सध्याच्या घडीला चित्रपट वर्तुळात अशाच एका चित्रपटातील दृश्याची चर्चा सुरु आहे. या दृश्याच्या निमित्ताने त्यातून झळकणारी अभिनेत्रीही ओघाओघाने प्रकाशझोतात आली असून, तिच्या वृत्तीची अनेकांनीच दाद दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाविश्वात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'आदाई' या दाक्षिणात्य चित्रपटाची आणि त्यातील न्यूड सीनची. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. जवळपास दीड मिनिटांच्या या आश्वासक ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरश: धडाका उडवला. हा धडाका टीझरचा होताच पण, त्याशिवाय हा धडाका होता त्यातील अवघ्या काही सेकंदांच्या एका न्यूड सीनचा. 


दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या दृश्याची अनेकांनीच प्रशंसा केली. अर्थातच इथे प्रशंसा होत आहे ती म्हणजे तिच्या अभिनयाची. याच दृश्याचं चित्रीकरण कशा प्रकारे करण्यात  आलं होतं, याचा उलगडा अमालाने 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत केला. 


दिग्दर्शक रत्न कुमार यांनी या दृश्यासाठी खास वेशभूषा करण्याची चर्चा केली होती. पण, याविषयी फार चिंता न करण्याचं अमालाने त्यांना सांगितलं होतं. पण, तरीही तिच्या मनावरील दडपण कायम होतं. याविषयीच अधिक माहिती देत अमाला म्हणाली, 'त्या क्षणाला, जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचले तेव्हाच मला दडपण आलं. सेटवर काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठीही माझ्या मनात चिंता होती. त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित असेल, सेटवरचं वातावरण कसं असेल याचाच विचार....', असं अमाला म्हणाली. 


'आदाई' चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी या दृश्यासाठी तुलनेने एका बंद सेटची व्यवस्था केली होती. 'त्या वेळी सेटवर फक्त १५जण उपस्थित होते. त्या पंधरा जणांवर, चित्रपटाच्या टीमवर माझा विश्वास नसता तर, मी या दृश्याचं चित्रीकरण करुच शकले नसते', असा खुलासा तिने केला. अखेर दृश्य चित्रीत झालं आणि याच दृश्याची चर्चा पाहायला मिळाली.  



'आदाई' या चित्रपटाच्या पूर्वीच या कलाविश्वातून काढता पाय घेण्य़ाच्या निर्णयावर अमाला पोहोचली होती. आपली फसवणूक होत असल्याच्या भावनेने ती या निर्णयावर पोहोचली होती. महिलांच्या साचेबद्ध आणि दुर्बल भूमिकांसाठी अमालाला काम करण्याची आणि या व्यवस्थेचा भाग होण्याची इच्छा नव्हती. चौकटीबद्ध भूमिकांना शह देत आपलं अभिनय कौशल्य सादर करण्यालाच तिने कायम प्राधान्य दिलं आहे.