Sai Pallavi Actress : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रसिद्धीझोतात असणाऱ्या आणि वेगळेपण कायम जपणाऱ्या अभिनेत्री साई पल्लवीच्या चाहत्यांचा आकडा तसा मोठा आहे. फार कमी वेळातच या अभिनेत्रीनं फक्त दाक्षिणात्यच नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. हल्लीच एका मुलाखतीदरम्यान तिनं सांगितल्यानुसार बॉलिवूडमधून कोणा एका व्यक्तीनं तिला प्रसिद्धीसाठी पीआर एजन्सी किंवा तत्सम काही गोष्टींचा सल्ला दिला, ज्याकडे तिनं दुर्लक्ष केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2015 मध्ये 'प्रेमम' या मल्याळम चित्रपटातून सिनेजगतात पदार्पण करणाऱ्या साई पल्लवीनं आपण काही प्रकारचे कपडे ऑनस्क्रीन कधीच घालणार नसल्याचं ठरवल्याचंही सांगितलं. यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, 'फार आधी, मी जॉर्जियामध्ये एक डान्स परफॉर्मन्स दिला होता. तेव्हा डान्ससाठी गरज असणारे कपडे मी वापरले होते. पण, प्रेमम प्रदर्शित झाला तेव्हा माझे काही जुने व्हिडीओ व्हायरल झाले. मलाच काहीतरी बुजल्यासारखं वाटलं. कारण, लोक तसंच काहीसं बोलत होते. मला प्रेक्षकांना असं काहीच द्यायचं नाहीय, की त्यांना मी एखादा मांसाचा तुकडा वाटेन'. 


हल्ली बरीच सेलिब्रिटी मंडळी प्रसिद्धीसाठी पीआर एजन्सीशी हातमिळवणी करतात आणि हाच सल्ला बॉलिवूडमधील एका व्यक्तीनंही साई पल्लवीला दिला. त्यावेळी हे 'Boosting' नेमकं काय असतं? असाच प्रश्न तिनं विचारला. यावर तू एखादा चित्रपट करत नसतेस, प्रसिद्धीझोतात नसतेस तेव्हा पीआर मंडळी तुझ्याविषयी सोशल मीडिया पोस्ट करतील. ज्यामुळं तू चर्चेत राहशील असं उत्तर तिला मिळालं. मुळात ज्या गोष्टींचं आपल्यालेखी काहीच महत्त्वं नसतं त्या गोष्टी मी करतच नाही, अशीच आपली भूमिका असल्याचं साई पल्लवीनं तिच्या मुलाखतीदरम्यान सांगितलं. 


हेसुद्धा वाता : Maharashtra Assembly Election 2024 : शिवडीपासून धुळ्यापर्यंत... कोणाला संधी? ठाकरेंच्या पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर 


साई पल्लवीनं कायमच तिच्या वेगळेपणातून तिच्या एकंदर भूमिका स्पष्ट केल्या आहेत. ऑनस्क्रीन भूमिकांसाठी फारसा मेकअप किंवा सौंदर्यप्रसाधनांचा वापर न करण्याच्या भूमिकेमुळं ती कमाल चर्चेत आली होती. त्यामागोमागच सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींसाठी काम न करण्याची तिची भूमिकाही अनेकांचीच दाद मिळवून गेली होती. सहसा काही भूमिका उघडपणे मांडताना सेलिब्रिटी मंडळी दोनदा विचार करतात. पण, साई पल्लवी मात्र या साऱ्याला सातत्यानं शह देताना दिसतेय हेच खरं.