मुंबई : दाक्षिणात्य कलाविश्वात सुपरहिट आणि मोस्ट हॅपनिंग जोडी म्हणून (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) या दोघांकडेही पाहिलं गेलं. पण, त्यांच्या नात्याला तडा गेला आणि एकाएकी या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. (samantha ruth prabhu naga chaitnaya house)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून समंथा आणि नागा चैतन्य या दोघांनीही नात्यातून विभक्त होण्याची माहिती दिली. नातं तुटलं, पण त्यांच्यामध्ये असणारा भावनांचा बंध मात्र कायम असल्याचं दिसत आहे. 


नशिबाची खेळी म्हणा किंवा आणखी काही, पण समंथा आणि नागा चैतन्य या न त्या कारणानं एकमेकांसमोर धडकतात. आता म्हणे समंथानं हैदराबादमध्ये एक नवं घर खरेदी केलं आहे. 


नवं घर तिच्यासाठी बऱ्याच कारणांनी खास आहे. कारण, या घरात ती एकेकाळी नागा चैतन्यसोबत राहत होती. हल्लीच त्यांनी विभक्त झाल्यानंतर हे घर त्यांनी विकलं होतं. पण, ज्या व्यक्तीला हे घर विकलं त्यांच्याशी संपर्क साधत समंथानं ते स्वत:च खरेदी केलं. सध्या ती या घरात आपल्या आईसोबत राहत आहे. 


असं म्हणतात की, आठवणी कधीच मिटवता येत नाहीत. समंथा आता या घरात राहत असतानाच ती गतकाळातील आठवणी मिटवण्यात यशस्वी ठरते की या नात्यात आणखी एक नवं वळण येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.