मुंबई : झगमगणाऱ्या या कलाजगताने अनेक नवोदितांना आसरा दिला, काम दिलं, ओघाओघानं प्रसिद्धीही दिली. मुद्दा असा, की या अनेकांच्या यादीतून काही नावं मात्र वगळली गेली होती किंवा प्रकर्षानं त्यांना मागे ठेवण्यात आलं होतं. असं का झालं, याची कारणं समोर आली नाहीत. पण, असं ज्यांच्यासोबत झालं त्यांचा शेवट मात्र फार विदारक झाला होता. त्यातलंच एक नाव म्हणजे, अभिनेत्री सिल्क स्मिता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vijayalakshmi Vadlapati ही सिल्कची खरी ओळख. अनेक पाश ओलांडून तिनं स्वत:ची ओळख या कलाजगतामध्ये प्रस्थापित केली. वाईटातल्या वाईट दिवसांपासून तिनं चांगल्यातले चांगले दिवस पाहिले. 80- 90 च्या दशकात सिल्कचं नाव प्रत्येक दाक्षिणात्य निर्माता- दिग्दर्शकाच्या यादीत पाहायला मिळत होतं. (South indian Actress Silk Smitha suicide note goes viral will shocked you)


वाचा : सातासमुद्रापार अखेर अल्लू अर्जुन 'तिला' भेटलाच...; पत्नी नव्हे तर ही दुसरीच सौंदर्यवती


काळाची पावलं उलटी पडली आणि आर्थिक चणचण, अनेक अपयशी प्रेमप्रकरणं या साऱ्यामुळं ती खचत गेली आणि अखेर 1996 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी तिनं आयुष्य संपवलं. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सिल्कनं एका पत्रातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला, भावनांना शब्दांवाटे व्यक्त केलं आणि मोकळ्या मनाने तिनं अखेरचा श्वास घेतला. 


पत्रातले शब्द काळजावर घाव घालणारे... 
'फक्त मीच जाणते, की अभिनेत्री होण्यासाठी मी किती मेहनत घेतलीये. माझ्यावर कोणीच प्रेम केलं नाही, फक्त बाबू,  (Dr. Radhakrishnan) यांनी मला प्रेमाची अनुभूती करुन दिली. माझीही काही स्वप्न होती... ', असं म्हणताना ती स्वप्न पूर्ण करण्याची आस तर आहे पण आता कुठे जाईन तिथे मला शांतता मिळेनाशी झालीये याबद्दल सिल्कनं खंत व्यक्त केली होती. 


मला आता मृत्यूचं आकर्षण वाटतंय असं सांगताना तिनं आपल्याशी हाच न्याय झाला का? असा प्रश्नही देवाला केला. 'माझ्या शरीराचा अनेकांनी वापर केला, माझ्या कामाचा फायदा घेतला' अशा शब्दांत स्वत:वर झालेले आघात सिल्कनं या पत्रात मांडले. पत्र लिहिण्यातही अडचण येत असल्याचं सांगताना तिची लेखणीही तिथेच थांबली. 


सिल्कच्या मादक भूमिका आणि तिचा अंदाज प्रेक्षकांना चित्रपटांकडे आकर्षित करुन घेण्यासाठी वापरला गेला होता. पण, यामध्ये तिची प्रतिमा मलिन झाली आणि एका अभिनेत्रीपेक्षा तिच्याकडे Sex Symbol म्हणून पाहिलं जाऊ लागलं. एका अभिनेत्रीचा करुण अंत सिल्कच्या रुपात चाहते आणि सेलिब्रिटींनी पाहिला आणि तेव्हा मात्र सर्वजण हळहळले.