सातासमुद्रापार अखेर अल्लू अर्जुन 'तिला' भेटलाच...; पत्नी नव्हे तर ही दुसरीच सौंदर्यवती

19 वर्षांनंतरची ती भेट अतिशय खास... भावनिक... 

Updated: Aug 22, 2022, 10:08 AM IST
सातासमुद्रापार अखेर अल्लू अर्जुन 'तिला' भेटलाच...; पत्नी नव्हे तर ही दुसरीच सौंदर्यवती title=
actor Allu Arjun meets his first heroine aditi Agarwal in New York photo viral

Allu Arjun : कामाचा कितीही व्याप असला, तरीही अभिनेता अल्लू अर्जुन त्यातूनही वेळ काढत काही खास क्षण स्वत:साठीही देतो. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देणारा हाच अभिनेता येत्या काळात काही बड्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे. असं असतानाच कामात झोकून देण्यापूर्वी तो न्यूयॉर्कला (New York) पोहोचला आहे. 

Allu Arjun न्यूयॉर्कला नेमका कशासाठी गेला? तर, सुट्टीसाठी. पण, इथे त्यानं एका खास व्यक्तीची भेटही घेतली. तिच्या रुपावर एकेकाळी सगळेच भाळलेले, तिच्या स्मितहास्याची सर्वांनाच भुरळ पडलेली.... अल्लू अर्जुननं भेट घेतली ही काही त्याची पत्नी नव्हे, तर एक खास सौंदर्यवती होती. 

ही खास व्यक्ती म्हणजे, अभिनेत्री अदिती अग्रवाल. 'गंगोत्री' (Gangotri) या चित्रपटातून त्यानं अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. अदितीचाही तो पहिलाच चित्रपट होता. तब्बल 19 वर्षांनंतर अदिती आणि अल्लू अर्जुन पुन्हा एकत्र दिसले. अर्थात त्यानं परदेशात त्याच्या पहिल्या 'हिरोईन'ची भेट घेतली. (actor Allu Arjun meets his first heroine aditi Agarwal in New York photo viral)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaditi Agrawal (@kuku1285)

खुद्द अदितीनंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत ही ग्रेट भेट चाहत्यांसमोर आणली. कलाजगतामध्ये अल्लू अर्जुन सध्या यशशिखरावर आहे. श्रीमंती, प्रसिद्धी आणि यश यापैकी कशाचाच त्याला अभाव नाही. अशा परिस्थितीतही हा अभिनेता आपली सुरुवात कुठून झाली, हे विसरलेला नाही ही बाब पाहून चाहत्यांनीही त्यांच कौतुक केलं.