Music Director and Flimmaker S V Ramnan Death: राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं (Raju Srivastav Death) आत्ता कुठं बॉलीवूड सावरत होत तोच आता सिनेसृष्टीत या दिग्गज कलाकाराच्या निधनानं हादरली आहे. रेडिओचा लोकप्रिया आवाज असलेले अभिनेते, टेलिव्हिजन आणि चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार एस व्ही रामनन (S V Ramnan) यांचे सोमवारी, 26 सप्टेंबर रोजी पहाटे निधन झाले. या दिग्गजांच्या निधनाने इंडस्ट्रीतील अनेकांना धक्का बसला आहे. वयोमनानुसार उद्भवलेल्या आजारांमुळे रामनन यांचे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या आरए पुरम येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. (south indin director s v ramanan passed away film industry mourns)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (26 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. एसव्ही रामनन हे आघाडीचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांचे आजोबा आहेत आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. 


तुम्हाला कदाचित रामनन यांच्याविषयी फार माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला त्यांचा परिचय करून देतो. एसव्ही रामनन हे रेडिओ आणि टेलिव्हिजन उद्योगातील मोठं नाव होतं.




त्यांच्या आवाजाची जादू आजही त्यांच्या चाहत्यांवर अधिराज्य घालवते. व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून अनेक जाहिरातींना त्यांनी आवाज दिला आणि त्या आजही चाहत्यांच्या विशेष स्मरणात आहेत. त्यांनी लोकप्रिय ब्रँड्सच्या रेडिओ जाहिरातींसाठी आवाज दिला. रेडिओ जाहिरातींना व्हॉईस ओव्हर्स देणे आणि दूरदर्शन जाहिरातींचे दिग्दर्शन करण्याव्यतिरिक्त ते अनेक कामात कुशल होते. एसव्ही रामनन यांनी उरुवंगल मारलम (Uruvangal Maralam) नावाचा चित्रपट देखील दिग्दर्शित केला आणि विशेष म्हणजे त्यांनी चित्रपटासाठी संगीत देखील दिले. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार होते.