मुंबई : एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत सध्या साऊथ चित्रपटांचा बोलबाला आहे. बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला आहे. आधी RRR नंतर KGF Chapter 2 , या चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. बॉक्स ऑफिसवर साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला असला तरी हिंदी चित्रपट काही कमाल दाखवू शकलेले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. याबाबत इंडस्ट्रीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता अभिनेत्री रिचा चढ्ढाने आपलं मत मांडलं आहे. रिचाने बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे.


ऋचा चड्ढाने  दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. ऋचाने साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट हिट होण्यामागचं कारण स्पष्ट केलं आणि सांगितलं की, तिने तिची संख्या आणि तिकिटाच्या किंमतीचं गणित सुधारलं आहे. विजय स्टारर 'मास्टर'चं उदाहरण देत ऋचा म्हणाली की, फॅन क्लबमधील लोकं चित्रपट पाहण्यासाठी जातात. हिंदी चित्रपट उद्योग आणि त्यांचे वितरक यांच्या विपरीत, ते तिकिटांचे दर 100 ते 400 पर्यंत ठेवतात. तो हिट असो वा नसो. त्याचबरोबर, बॉलीवूडमध्ये तिकीटाची किंमत 400 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे चित्रपट पाहायला कमी लोकं येतात.


चित्रपट वितरण समस्या
ऋचा पुढे म्हणाली की,  त्रास चित्रपटांच्या वितरणामध्ये आहे. जिथे थिएटर तिकिटांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अलीकडेच एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मला आशा आहे की तो लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होईल. सिनेमाचे लीड हवेत होते. पण जेव्हा चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं तेव्हा त्याचं कलेक्शन हीरोच्या फीच्या एक तृतीयांशपेक्षा कमी होतं. सिनेमा टिकवायचा असेल तर इंडस्ट्रीतील बड्या स्टेकहोल्डर्सनी जबाबदारी घेतली पाहिजे.