प्रसिद्ध दक्षिण कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; पायऱ्यांवरुन खाली पडल्याने गमावला जीव
प्रसिद्ध दक्षिण कोरियन (South Korean) अभिनेत्री Park Soo Ryun चं निधन झालं आहे. वयाच्या 29 व्या वर्षी तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. Snowdrop मधील तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
Park Soo Ryun Dies: प्रसिद्ध दक्षिण कोरियन (South Korean) अभिनेत्री Park Soo Ryun चं निधन झालं आहे. वयाच्या 29 व्या वर्षी तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. Snowdrop मधील तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, Park Soo Ryun जेजु आयलँडवर (Jeju Island) गेली होती. यावेळी पायऱ्यांवर खाली पडल्याने तिचं निधन झालं. Park Soo Ryun जेजु येथे परफॉर्म करण्यासाठी गेली होती. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याने दक्षिण कोरियन चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.
दक्षिण कोरियामधील पब्लिकेशन Osen ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही दुर्देवी घटना घडली. Park Soo Ryun पायऱ्यांवरुन खाली पडल्यानंतर तिला तात्काळ घऱी नेण्यात आलं होतं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं. यानंतर कुटुंबाने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
Soompi ने दिलेल्या वृत्तानुसार, Park Soo Ryun च्या आईने सांगितलं आहे की, "तिचं ह्रदय धडधडत आहे. पण तिचा मेंदू बेशुद्ध आहे. बाहेर कोणाला तरी अवयवांची फार नितांत गरज असावी. आई आणि वडील म्हणून तिचं ह्रदय कोणाला तरी मिळालं आहे आणि ते धडधडत आहे याच जाणीवेने आमचं सांत्वन होईल".
2018 मध्ये पदार्पण केल्यानंतर, Park Soo Ryun अनेक प्रोजेक्ट्समध्ये सहभागी झाली होती. यामध्ये Finding Mr Destiny, The Days We Loved आणि Siddhartha यांचा समावेश आहे. Snowdrop मध्ये Snowdrop विद्यापीठातील एका विद्यार्थ्याची भूमिका साकारताना दिसली होती. कार्यक्रमात छोटी भूमिका असतानाही, तिने नंतर तिचे सह-कलाकार Jung Hae-in आणि Jisso यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. तिने त्यांचं कौतुक केले होते आणि इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. रेनड्रॉप हा तिचा पहिला के-ड्रामा होता. Park Soo Ryun प्राण्यांची आवड होती. तिच्याकडे कांटो नावाची पाळीव मांजर होती.
Park Soo Ryun चा मृतदेह शवगृह ग्योन्गी प्रांतीय वैद्यकीय केंद्राच्या सुवॉन हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. 13 जून रोजी अंत्यसंस्कार होईल. 13 जून रोजी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.