मुंबई : अजय देवगण याच्यासोबत ‘दृश्यम’ सिनेमात दिसलेली आणि साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेरी श्रिया सरन लवकरच लग्न करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


रशियाचा बॉयफ्रेन्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री श्रिया सरन ही तिच्या रशियातील बॉयफ्रेन्डसोबत लग्न करणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ती लग्न बंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांची भेट होऊन जास्त काळ लोटला नाही. तरीही दोघांनी त्यांच्या नात्याला लग्नात रूपांतरित करण्याचं ठरवलं आहे. 


इथे होणार लग्न?


मीडिया रिपोर्टनुसार, श्रिया सध्या रशियमध्ये तिच्या बॉयफ्रेन्डच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेली आहे. श्रियाला डेस्टीनेशन वेडींग करायचं आहे. त्यामुळेच त्यांनी राजस्थानमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 


श्रियाचं करिअर


श्रियाने अनेक तमिळ आणि तेलगु सिनेमात काम केलं आहे. साऊथमधील अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलंय. तिने तिच्या करिअरची सुरूवात २००१ मध्ये ‘इश्तम’ या सिनेमाने केली होती. श्रियाने दीपा मेहताच्या ‘मिडनाइट चिल्ड्रन’ मध्येही काम केलं. तिच्या या कामाचं खूप कौतुक झालं.