Ajith Kumar Accident: ५३ वर्षीय साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात (Ajith Kumar’s Dubai car crash) झाला आहे. अभिनेता अजित कुमार सध्या आगामी दुबई 24 तासांच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी दुबईत आहे. या स्पर्धेला  24H दुबई 2025 असेही म्हटले जाते.  यावेळी, अभिनेता रेसिंग कारमधून जात असताना कारमध्ये स्फोट झाला.ही कार फिरून भिंतीला धडकली. हा भीषण अपघात लोक बघताच बसले. 


अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते घाबरले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघाताचा भीषण व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. अजित कुमार यांच्या चाहत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये अजित रेस सुरू होण्यापूर्वी सराव करताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या रेसिंग कारला धोकादायक अपघात झाला. अहवालानुसार, अभिनेता ठीक आहे आणि त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. तसेच, त्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.


 


कारचे झाले तुकडे


अजितच्या गाडीचा एवढा भीषण अपघात ज्या कोणी पाहिला त्याला धक्काच बसला. कारचे तुकडे झाल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. याआधीही अजित कुमार यांच्या जीवाला धोका होता. 


बघा अपघाताचा व्हिडीओ 


 



 


 


शूटिंगदरम्यान कार उलटली


खरतर, अभिनेता 'विदमुयार्ची' चित्रपटाचे शूटिंग करत होता. यावेळी एका कारचे सीन शूट केले जात होते. आजर बैजानच्या वाळवंटात शूटिंग सुरू होतं. जिथे शूटिंगदरम्यान अभिनेत्याची संपूर्ण कार उलटली.अजित कुमार हा साऊथचा लोकप्रिय ॲक्शन हिरो आहे. त्यांचे 'कमांडो', 'बिल्ला' अशा अनेक चित्रपट हिट ठरले आहेत.