मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता महेश बाबू, याचा भाऊ (Actor Naresh) हल्लीच त्याच्या खासगी आयुष्यामुळं कमाल चर्चेत आला आहे. नरेश त्याच्या चित्रपटांपेक्षा याच कारणामुळं सातत्यानं चर्चेत आहे. आता म्हणे त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या या फोटोमध्ये नरेशची पत्नी, रम्या रघुपती प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळत आहे. 


तिचा संताप इतका अनावर होतोय, की पती हॉटेलच्या रुममधून बाहेर पडताच ती त्याच्यामागे चप्पल घेऊन जाताना दिसत आहे. अभिनेता नरेश याला त्याची पत्नी रम्या हिनं एका अभिनेत्रीसोबत पकडलं. 


विवाहित असतानाही नरेश अभिनेत्री पवित्रा लोकेश हिच्यासोबत जवळीत साधत असल्याचे आरोप त्याच्या पत्नीनं लावले. बरं, पत्नीनं आपली चोरी पकडलेली असतानाही नरेशची यावर असणारी प्रतिक्रिया आश्चर्य वाटेल अशीच आहे. 


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका हॉटेलच्या रुमबाहेर प्रचंड गर्दी दिसत आहे. या गर्दीतूनच नरेश आणि त्याच्यामागोमाग पवित्रा बाहेर येताना दिसत आहेत. इथं ते दोघं खोलीतून बाहेर येतानाच तिथं उपस्थित असणाऱ्या रम्याच्या तळपायाची आग मस्तकात जाताना दिसत आहे. 


महिला पोलीस घटनास्थळी असल्यामुळं परिस्थिती निभावली आणि रम्याला रोखता आलं, अन्यथा ती पतीवर हल्ला करण्याचाच मनस्थितीत होती हेच या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. नरेश मात्र पत्नीच्या या संतापानंतरही ताठ मानेनं लिफ्टपर्यंत जाताना दिसत आहे. मिश्किल हसण्यामुळं त्याच्या या वागण्यावर चाहत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 



रम्या नरेशची तिसरी पत्नी आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. तर, पवित्राही विवाहित आहे. पण, आता मात्र या दोघांच्याही प्रेमसंबंधांनीच प्रचंड लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.